रुग्णांना रुग्णांच्या नातेवाईकांना सलग 1825 दिवस अन्नदान वाटप करणारे प्रसिद्ध खिचडी वाले गुरुजी ह. भ. प. गोविंद महाराज पौढे गुरुजी यांचा सत्कार

0
75

परभणी प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज नेटवर्क

आज राष्ट्रजन फाउंडेशन परभणी व वीर वारकरी सेवा संघाच्या वतीने राम कृष्ण हरी अन्नदान छात्रालय सरकारी हॉस्पिटल परभणी चे मुख्य संकल्पक संस्थापक अध्यक्ष ह भ प गोविंद महाराज पौढे गुरुजी यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने भव्य दिव्य सत्कार सोहळा सत्कारमूर्ती प्रसिद्ध खिचडी वाले गुरुजी ह भ प गोविंद महाराज पौढे गुरुजी यांचा शाल श्रीफळ हार पुष्पगुच्छ व पुस्तक देऊन सत्कार व स्वागत गौरव करण्यात आला पौढे गुरुजी यांनी मागील पाच वर्षापासून शासकीय रुग्णालय येथे दररोज अन्नदान खिचडी वाटप म्हणजे आतापर्यंत 1825 दिवस रुग्णांना रुग्णांच्या नातेवाईकांना खिचडी वाटपाचा उपक्रम राबवतात त्याचबरोबर हजारो विद्यार्थी शिक्षणापासून घडवले वेगवेगळ्या क्षेत्रात सामाजिक अध्यात्मिक धार्मिक कीर्तनाच्या माध्यमातून समाजकार्य मोफत कीर्तन करणारे एकमेव महाराज अशा कार्याबद्दल सन्मान व गौरव दिनांक 15 जून 2024 रोजी शिवराम नगर येथे राम कृष्ण हरी अन्नदान कार्यालय संध्याकाळी आठ वाजता सत्कार व स्वागत करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवमुद्रा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष समाजसेवक सूर्यकांत मोगल पाटील कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे भारतीय जनता पार्टी सरचिटणीस आकाश राव लोहोट पाटील मांडाखळीकर युवा मेडिकल असोसिएशनचे स्वप्निल गरुड पिंगळीकर तसेच अभिष्टचिंतन सोहळा सत्कार संयोजक राष्ट्र जन फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष राष्ट्रीय गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले प्रत्येकाने इतर खर्च टाळू वाढदिवस असो कोणताही उपक्रम यांना वाचून कोणी राहू नये ही संकल्पना करा आणि अन्नदान करा अशी माहिती वीर वारकरी सेवा संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष धार्मिक सेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकाद्वारे माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here