परभणी प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज नेटवर्क
बकरी ईद च्या अनुषंगाने परभणी शहर पोलीस प्रशासना विभागाच्या वतीने दिनांक 15 जून 2024 रोजी सकाळी अकरा वाजता नवा पोलीस स्टेशन परभणी शहरातील सर्व गोसेवक व गो रक्षक व सर्व पोलीस प्रशासना अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये या प्रसंगी श्री दिनकर डंबाळे (उपविभाग पोलीस अधिकारी परभणी शहर) त्यांनी सर्व गोसेवकांना मार्गदर्शन केले व सर्वांना सांगितले की काही जिथे कुठे गोमाता व नंदी बैल यांचा बचाव करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडे संपर्क साधावा किंवा पोलीस प्रशासनाचा फोन नंबर लावून किंवा जवळपासच्या पोलीस स्टेशन कडे संपर्क साधून त्या त्या विभागाकडे कळवावे असे याप्रसंगी मार्गदर्शन करण्यात आले यावेळी सर्व गोसेवक प्रतिनिधी ज्येष्ठ गोसेवक शिव प्रसाद कोरे राष्ट्रीयगोसेवक नितीन जाधव गोगलगावकर अरुण पवार सचिन रसाळ शंकर देशमुख शिंदे आधी बहुसंख्य गोसेवक गोरक्षक व गोमाता प्रेमी प्राणीमित्र परभणी शहर उपस्थित होते.

