
परभणी प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज नेटवर्क
परभणी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उपचार घेत असलेल्या एका गरजू रुग्णांस रक्ताची अत्यंत आवश्यकता होती तेव्हा सदरील रुग्णाचे नातेवाईक यांनी समाजहित अभियान प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष तथा दयावान सरकार परभणी जिल्हा कार्याध्यक्ष तथा लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ चे परभणी जिल्हा सचिव प्रमोद अंभोरे यांच्याशी संपर्क साधला असता प्रमोद अंभोरे यांनी तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालय गाठून सदरील रुग्णास कोणते रक्त लागत आहे हे जाणून घेऊन परभणी शहरातील समाजहितासाठी सामाजिक कार्य करणारी सामाजिक संस्था समाजहित अभियान प्रतिष्ठान व संपूर्ण महाराष्ट्र भर गोर गरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी अग्रेसर असलेली सामाजिक संघटना दयावान सरकार महाराष्ट्र राज्य च्या वतीने समाजहित अभियान प्रतिष्ठान चे सदस्य विजय पवार यांच्याशी संपर्क साधला तेव्हा विजय पवार यांनी परभणी जिल्हा सामान्य रुग्णालय येथील मेट्रो ब्लड बँक येथे दिनांक 15 जून रोजी रक्तदान करून सदरील रुग्णास रक्तदान करून रक्त उपलब्ध करून दिले.

सदरील रुग्णास रक्तदान केल्याने रक्तदाते विजय पवार यांचा समाजहित अभियान प्रतिष्ठान दयावान सरकार, रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया आठवले व्यापारी आघाडी, लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ च्या वतीने पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. रक्तदान केल्याने रुग्ण व रुग्णाचे नातेवाईक यांनी रक्तदाते विजय पवार व प्रमोद अंभोरे यांचे आभार मानले. यावेळी प्रमोद अंभोरे, रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया आठवले व्यापारी आघाडी चे मराठवाडा अध्यक्ष राजाभाऊ येटेवाड, शिवकन्या हिवाळे, समाजहित न्युज चॅनल चे व्यवस्थापक प्रतिनिधी शेख अझहर, मदार भाई, भीमा कोरेगाव मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संदीप वायवळ, ब्लड बँक कर्मचारी, पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी प्रमोद अशोकराव अंभोरे यांनी परभणी जिल्हा सामान्य रुग्णालय मेट्रो ब्लड बँक येथे रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन शहरातील युवकांना, युवतीना, नागरिकांना स्व:इच्छेने रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे.














