विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नाचे फलित
तालुक्यातील विकास कामांना गती मिळणार
कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधि
चंद्रपूर
लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातील सावली तालुक्यातील अनेक काम ठप्प पडली होती, तर राज्याचे विरोधी पक्ष नेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी आचार संहिता संपताच विकास कामांचा झंजावात कायम ठेवत आपल्या विशेष प्रयत्नातून मंजूर सावली तालुक्यातील ५ कोटी ३० लक्ष रुपयांच्या विकास कामांचा भुमीपूजन व लोकार्पण सोहळा आज पार पडला.
आज पार पडलेल्या सावली तालुक्यातील विकास कामांमध्ये उसेगांव येथे मनरेगा अंतर्गत मंजूर रू. ३० सि.सी. रोड बांधकाम व २५१५ शिर्षालेखा अंतर्गत रू. १० लक्ष निधीतून सि.सी. रोडचे बांधकाम,खनिज विकास निधी अंतर्गत मंजूर नालीचे बांधकाम, व बळीराजा पांदन रस्ता योजनेअंतर्गत रू. ३० लक्ष निधीतून पांदण रस्ता बांधकामाचे भुमीपूजन, तर मातोश्री पांदण रस्ता अंतर्गत मंजूर रू. ३८ लक्ष निधितून पांदण रस्त्याचे भुमीपूजन जिबगाव येथे जनसुविधा योजनेअंतर्गत मंजूर रू.२० लक्ष नवीन ग्रा.पं. इमारत बांधकामाचा व २५१५ शिर्षालेखा अंतर्गत मंजूर रू. ३० लक्ष सभागृहाच्या बांधकामाचा लोकार्पण सोहळा, मनरेगा अंतर्गत मंजूर रू. ३० लक्ष निधितुन सि.सी. रोड बांधकामाचे भुमिपूजन , खनिज विकास निधी अंतर्गत मंजूर सि.सी. रोडचे भुमीपूजन, जिल्हा वार्षीक योजना अंतर्गत मंजूर रू. २१ निधीतुन पांदण रस्त्याचे बांधकामाचे भुमीपूजन, लोंढोली येथे मनरेगा अंतर्गत मंजूर रू. ३० लक्ष चे सि.सी. रोड बांधकाम व जनसुविधा योजनेअंतर्गत मंजूर रू. २० लक्ष नवीन ग्रा.पं. इमारत बांधकामाचा लोकार्पण कार्यक्रम,खनिज विकास निधी अंतर्गत मंजूर रू. ७० लक्ष लोंढोली ते चिचडोह रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण कामाचा भुमीपूजन कार्यक्रम , २५१५ लेखाशिर्ष अंतर्गत सभागृह बांधकामाचा भुमीपूजन कार्यक्रम तसेंच खनिज विकास निधी अंतर्गत मंजूर रू. ३० लक्ष प्रजिमा २८ ते वानरदेव पर्यंत नालीच्या बांधकामाचा भुमीपूजन खनिज विकास निधी अंतर्गत मंजूर सि.सी. रोड बांधकामाचा भुमीपूजन ,
साखरी येथे खनिज विकास निधी अंतर्गत मंजूर रू. ३० लक्ष चे मार्कंडादेव नदीघाट ग्रामा ६४ रस्त्यावरील रपट्याची (पुलाचे) सुधारणा करणे कामाचे भुमीपूजन बळीराजा पांदण रस्ता योजनेअंतर्गत मंजूर रू. ३० चें शेतापर्यंत पांदण रस्त्याचे बांधकाम , खनिज विकास निधी अंतर्गत मंजूर सि.सी. रोडचे बांधकाम, हरंबा येथे मनरेगा अंतर्गत मंजूर रू. ३० सि.सी. रोड बांधकाम, जिल्हा वार्षीक योजनेअंतर्गत मंजूर नवीन आंगणवाडी इमारत बांधकाम, खनिज विकास निधी अंतर्गत मंजूर रू. ३० लक्ष चे रस्त्याचे बांधकाम करणे बांधकाम अश्या एकूण ५ करोड ३० लक्ष रुपयांच्या विकासकामांचा समवेश असुन आज याचे लोकार्पण व भूमिपूजनाचे कार्यक्रम विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते पार पडले.
भूमिपूजन व लोकार्पण सोहळया प्रसंगी जेष्ठ काँग्रेस नेते व माजी जिल्हा परिषद सदस्य मा.एड.रामभाऊ मेश्राम,माजी बांधकाम सभापती जि.प.चंद्रपुर दिनेश पाटील चिटणुरवार, तालुकाध्यक्ष नितीन गोहने,माजी सभापती पंचायत समिती सावली विजय कोरेवार,नगराध्यक्ष लता लाकडे, उपनगराध्यक्ष संदीप पुण्यपकार, विधानसभा उपाध्यक्ष नितीन दुवावार,युवा शहर अध्यक्ष अमरदीप कोणपत्तीवार,विविध सहकारी शेत.उत्पादक सोसायटी अध्यक्ष मोहन गाडेवार,पाणी पुरवठा आरोग्य व स्वच्छता सभापती प्रीतम गेडाम,नगरसेवक सचिन संगीडवार,अंतबोध बोरकर,तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

