श्री. बालमित्र नवयुवक मंडळाच्या वतीने
कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधि
चंद्रपूर
नागभीड तालुक्यातील गिरगाव येथील काँग्रेसचे नेते तथा लक्ष्मी नागरी पथसंस्थेचे अध्यक्ष विनोद बोरकर आपल्या कार्यकर्तव्यातून व सामाजिक ज्ञान ठेवून जनसामान्यांचाआधार वस्त्र म्हणून सतत नागभीड तालुका कार्यक्षेत्र बनवून आपल्या सामाजिक कार्य कुशलतेच्या बळावर जनसामान्याच्या आधार म्हणून ज्याची नागभीड तालुक्यात ओळख निर्माण करणारे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत गिरगाव येथील श्री बालमित्र नवयुवक मंडळाच्या वतीने आधार वस्त्र पेढ़ी चे लोकार्पण महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
या सोहळ्याला महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते नामदार विजय वडेट्टीवार, राष्ट्रीय उपाध्यक्ष ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश तथा समन्व्यक चिमूर विधानसभा डॉ. सतिश वारजुकर, काँग्रेसचे जेष्ठ नेते प्रफुल खापर्डे, माजी जिल्हा परिषद सदस्य खोजराम मरसकोल्हे, नागभीड तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष प्रमोद चौधरी, चिमूर तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष डॉ. विजय गावंडे, तालुका काँग्रेस कमिटी सचिव शरद सोनवाने व संपूर्ण काँग्रेस पदाधिकारी, गावकरी उपस्थित होते.

