कुटुंबाची जबाबदारी
बाबा तुमच्या खांद्यावर
स्वतःलाही विसरून
पार पाडता जीवनभर
मुलांच्या उच्च शिक्षणाला
पैसा सारा खर्च करता
एक दिवस खुर्चीवर बसून
साहेब त्याला बघायचं म्हणता
घरात नसता बाबा तुम्ही
शिस्त आमच्यात राहत नाही
कल्ला गोंधळ करून आम्ही
घर डोक्यावर घेत राही
मुलायम तुमचं अंतर्मन
वेदना दिसतात मुखावर
पण कठोर व्यक्ती म्हणून
ओळख साऱ्या जगभर
आई आणि लेकरावर
प्रेम तुम्ही अफाट करता
दुखलं खूपल त्यांचं तर
मनातून एकटे रडता
तुम्ही आहे म्हणून बाबा
हिम्मत आम्हा मिळते
तुमच्या या लेकरासाठी
कायम सोबत राहावे
कवयित्री-संगीता राजेश नागदिवे
यवतमाळ

