विशाल निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त चंद्रपूर महानगरात भव्य रक्तदान शिबिर संपन्न
दिपाली पाटील
जिल्हा उपसंपादक
चंद्रपूर
चंद्रपूर – भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चा अध्यक्ष विशाल निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त युवा मोर्चा चंद्रपूर तर्फे येथील स्थानिक शामा प्रसाद मुखर्जी सभागृहात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालयाचे शल्यचिकीस्तक डॉ. महादेव चिंचोळे तर विशेष उपस्थिती म्हणून चंद्रपूर जिल्ह्याचे नामवंत सर्जन व जिल्हा महामंत्री भाजपा डॉ.मंगेश गुलवाडे तर भाजपाचे जेष्ठ कार्यकर्ते प्रकाश धारणे माजी नगरसेवक छबुताई वैरागडे समाजसेवक हकीम भाई व भाज्ययुमो चे महामंत्री व्यासपीठावर हजर होते.
या रक्तदान शिबिरात डॉ. मंगेश गुलवाडे बोलताना म्हणाले की उन्हाळ्यात सर्वात जास्त रक्ताची गरज असते तर यावेळी कुणीही रक्तदान करत नाही तरी आपल्या अध्यक्षाच्या वाढदिवसानिमित्त आपण समोर येऊन रक्तदान केल्याबद्दल युवकांकचे आभार मानले व रक्तदान हे समाजाप्रती दातृत्व वृत्ती ठेवण्याचे प्रतीक म्हणून त्यांनी रक्तदात्यांचा गौरव केला.
या शिबिरात एकूण 40 युवक- युवतींनी रक्तदान केले रक्त संकलन हे शासकीय महाविद्यालय रक्तपेढी संकलन यांनी केले. रक्तदात्यांना प्रोत्साहन पर म्हणून विशाल निंबाळकर मित्र परिवारातर्फे एक लॅपटॉप बॅग देण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन मुग्धा खांडे तर गणेश रामगुंडेवार यांनी आभार मानले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी युवा मोर्चा चंद्रपूरच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अथक परीक्षा घेतले.

