prabodhini news logo
Home कविता कविता – प्रेमळ मूर्ती रमा माऊली

कविता – प्रेमळ मूर्ती रमा माऊली

0
123

दिव्य प्रपंचाचा गाडा परिश्रमाने ओढला
त्यागशील प्रेमळ मूर्ती रमा माऊली ग…
तिने संसार आपला नीटनेटका हो केला
तिच्या जीवनाचे गाऊ मुखी गोडवे गं…

ज्ञानसंपन्न पतीचा होता तिला स्वाभिमान
चिल्यापिल्यांची असे धैर्यवान ती आई…
रानीवनी फिरूनिया गोवऱ्या वेचिल्या
नित्य दुःख संघर्षाशी झुंजली रमाई…

चिमण्यांना भरवून उपाशी ती राहिली
दीर्घकाळ गुंतूनी गेली रमा प्रपंचात…
कृतीमधून रमाईच्या स्वामीनिष्ठा झळकली
निरांजणामधली जणू ती प्रज्वलित ज्योत…

घरीदारी राबुनी केले जीवापाड कष्ट
सुखानेही कशी ही पाठ फिरवली…
जीर्ण फाटक्या वस्त्रात कौतुकाने हसूनी
क्रांतीसूर्य भिमरावांची स्फूर्तिस्थान ठरली…

धर्मपत्नी ती रमाई मायेची सावली
एकनिष्ठ जीवनसाथी कायम राहिली…
बहुमानाचा मुकूट डोईवरी मिरविला
जीवन जगतांना काजव्यापरी चमकली…

कवयित्री – रूपाली निखारे
नागपूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here