खरीप हंगाम २०२४ साठी एक रुपयात पिक विमा योजना

0
60

१५ जुलैपर्यंत शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे

कृषी विभागाचे आवाहन

उषा नाईक
जिल्हा संपादिका
वाशीम

वाशिम,दि.२५ जून प्रधानमंत्री पिक विमा योजनेत शेतकऱ्यांना एक रुपया विमा हप्ता भरून सहभागी करून घेण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने २०२३ मध्ये घेतला आहे . गतवर्षी खरीप २०२३ मध्ये जिल्‍ह्यातील विक्रमी असे ४ लाख ३७ हजार ३२८ शेतकऱ्यांनी नोंद केली होती . आजपर्यंत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत १५३ कोटी, ४९ लाख, ७४ हजार, ८६३ रु. लाभ मिळाला आहे. विविध नैसर्गिक आपत्तींमुळे पिकाच्या होणा-या नुकसानीपासून शेतक-यांस आर्थिक संरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून हि योजना राबविण्यात येत आहे . खरीप २०२४ हंगामात पेरण्या सुरु झाल्या आहेत . शेतकऱ्यांना विमा योजनेत सहभाग घेण्यासाठी केंद्र शासनाचे पिक विमा पोर्टल www.pmfby.gov.in सुरु करण्यात आले आहे

अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकासाठी पिक कर्ज घेतलेल्या शेतक-यांस देखील या विमा योजनेत सहभाग बंधनकारक नाही.मात्र त्‍यासाठी शेतक-यांना विमा योजना भाग घेण्‍याच्‍या अंतिम दिनांक आधी किमान ७ दिवस संबंधीत बॅंकेस विमा हप्‍ता भरणे बाबत लेखी कळवणे गरजेचे आहे इतर बिगर कर्जदार शेतक-यांना आपला सातबाराचा उतारा, आधार कार्ड, बॅंक पासबुक, व पिक परेणीचे स्‍वयं घोषणापत्र घेवुन प्राधिकृत बॅंकेत किंवा कॉमन सर्विस सेंटरच्‍या मदतीने आपण विमा योजनेत सहभाग घेऊ शकता किंवा www.pmfby.gov.in या पोर्टलचे सहाय्य घेऊ शकता.
योजनेत सहभागासाठी अंतीम मुदत १५ जुलै २०२४ आहे. योजनेच्या अधिक माहितीसाठी केंद्र शासनाचे कृषिरक्षक पोर्टल हेल्पलाईन १४४४७ , संबंधित विमा कंपनी , स्थानिक कृषि विभाग कार्यालयाशी संपर्क साधावा.
शेतकऱ्यांनी एक रुपया भरून आपल्या पिकाचा विमा घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here