प्रशांत रामटेके
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज
नागपूर येथील माहेश्वरी भवन हिरवी नगर येथे दिनांक ३० जून २०२४ रोजी खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सत्कार समारोह आयोजित केला आहे.
यात रूपाली निखारे ,नागपूर यांचा साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांना शहर अध्यक्ष दुंनेश्वरजी पेठे यांच्या अध्यक्षतेखाली मा. लिला चितळे थोर गांधीवादी,ज्येष्ठ स्वतंत्र सैनिक यांच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात येत आहे.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मा.अनिल देशमुख ( माजी गृहमंत्री , महा.राज्य ) मा.रमेश बंग ( माजी मंत्री महा.राज्य ) तसेच प्रमुख उपस्थिती मा.डॉ.मीनाक्षी पावडे ( कला साहित्य ) मा.प्रमोद काळबांडे (पत्रकार) मा .शेखर सावरबांधे (माजी उपमहापौर )तसेच शैल जेमिनी (नाट्य कलावंत) यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होत आहे.

