सुविद्या बांबोडे
जिल्हा संपादक
चंद्रपूर
आंतरराष्ट्रीय मादक पदार्थ व व्यापार विरोधी दिनानिमित्त जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चंद्रपूर व झेप व्यसनमुक्ती केंद्र चंद्रपूर च्या वतीने दी.29/6/ 2024 रोजी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश समृद्धी भीष्म यांच्या मार्गदर्शनाखाली झेप व्यसनमुक्ती केंद्र चंद्रपूर येथे प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सदर कार्यक्रमात जिल्हा विधी सेवाप्राधिकरण, चंन्द्रपुरचे मा.सचिव तथा दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर मा. सुमित जोशी सर, ऍड. महेंद्र असरेट, समुपदेशक धनंजय तावाडे प्रकाश पालिवाल उपस्थित होते. मा. न्यायमूर्ती सुमित जोशी सर यांनी मादक पदार्थाचे दुष्परिणाम विषद करून जिल्हा विधी सेवा प्रधिकरणा तर्फे देण्यात येणाऱ्या विविध विधी सेवांची माहिती दिली .याप्रसंगी मानसिक आरोग्य समुपदेशक धनंजय तावाडे, ऍड महेंद्र असरेट यांनी सुद्धा मार्गदर्शन केले.प्रास्ताविक झेप चे प्रकल्प निर्देशक प्रकाश पालिवाल यांनी केले. संचालन प्रफुल लोणारे यांनी तर आभार प्रदर्शन अश्विनी सोनुले यांनी केले. कार्यक्रमाला व्यसनमुक्ती केंद्रातील सर्व रुग्ण आणि स्टाफ उपस्थित होते.

