प्रशांत रामटेके
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज नेटवर्क
9168369784
परभणी – दिनांक 30 जुन 2024 रविवार रोजी मुस्लिम समाजाच्या शेकडो युवकांनी आम आदमी पार्टी मध्ये प्रवेश केला जिल्हा अध्यक्ष सतीश भैया चकोर यांच्या वतीने प्रवेश केलेल्या युवकाचा पार्टी मफलर व हार घालुन सत्कार करण्यात आला व या कार्यक्रम मध्ये जिल्हा अध्यक्ष सतीश भैया चकोर यांनी नवीन कार्यकर्ते यांना मार्गदर्शन केले व परभणी शहर हे विकासा पासून वंचित आहे व परभणी शहर मध्ये एमएडीसी मध्ये मोठ्या कंपन्या नसल्याने युवकांना दुसर्या मोठ्या शहरात कामा साठी जावे लागते आणि शहरात धुळ असल्याने अनेक बिमारीची संख्या वाढली आहे . गरीब लोकांनी मुलांना शिक्षण देणे महाग झाले आहे. इथे लोकांना खाजगी शाळा मध्ये लुट होत आहे जे सरकारी व जिल्हा परिषदेचे शाळा काही वर्षे पासुन बंद झाले आहे यावर कोणीही लक्ष देत नाही. आरोग्य केंद्र तर सरकारने बांधले मात्र या मध्ये डॉक्टर व नर्स उपलब्ध नाही. शहर मध्ये विज एकदा गेली कि 4 ते 5 तास येत नाही.
इथल्या नेत्यांना या प्रश्रांच काही सोयरसुतक नाही. हे नेते लोक निवडणूक आली कि खान पायजे कि बान व जाती-धर्माच्या नावाखाली निवडून येतात कोणी नेते विकास कामे करत नाही फक्त नारळ फोडतात.
या कार्यक्रमाचे आयोजन मोहम्मद जुनेद अन्सारी व जाफर यांनी केले. शेख इसाक यांच्या मार्गदर्शन खाली साखला प्लोट चे माजी नगरसेवक शेख मुनीर भाई याच्या मुलगा शेख ऊमेर सर्व ग्रुप सोबत पार्टी मध्ये प्रवेश केला आणि समाजिक कार्यकर्ता शेख शकील यांनी आपल्या कार्यकर्त्या सोबत प्रवेश केला व डॉ शेख जुनेद यांनी आपल्या मित्राच्या सोबत प्रवेश केला.
या वेळी उपस्थित आम आदमी पार्टी महासचिव अनिल देशमुख ,सह कोषाध्यक्ष रामभाऊ , शिक्षक आघाडी कल्याण क्षीरसागर, रणजित,माऊली झाडे,अनिल झाडे, गोविंद झाडे प्रल्हादराव झाडे(मुरुंबेकर), निहाल अन्सारी, शेख सोहेल इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

