लोकसभा जिंकली आता विधानसभा जिंकू कार्यकर्त्यांचा निर्धार

0
81

जूनासूर्ला आभार बैठकीत निर्णय

दिपाली पाटील
जिल्हा उपसंपादक
चंद्रपूर

चंद्रपूर – वनी – आर्णी लोकसभा निवडणुकीत सुधीर मुनगंटीवार यांचा 2 लाख 60 हजार मतांनी प्रतिभा धानोरकर यांनी पराभूत करून त्यांचे मनसुभे धुळीस मिळवण्याचा काम या निवडणुकीत कार्यकर्त्यांनी करून दाखविला. त्याचबरोबर बल्लारशाह विधानसभा क्षेत्रातील सुधीर मुनगंटीवार यांचा बालेकिल्ला असून सुद्धा कार्यकर्त्या च्या मतांची लीड काँग्रेस पक्षांनी प्रतिभा धानोरकर यांना मिळवून दिली आहे. त्यामुळे या बल्लारशाह मतदारसंघातील मुल तालुक्यातील जाहीर आभार मानणे आवश्यक होते.
त्यामुळे आजच्या बैठकीत नांदगाव, बेंबाळ, जूनासुर्ला , गडीसुर्ला, चांदापूर, राजगड , भवराळा, बाबराळा , भंजाळी, भेजगाव , सिंतळा विरई , फिस्कुटी, चक दुगाळा, दुगाळामाल, हळदी, चीचाळा आदी भागातील 32 गावातील 300 ते 350 कार्यकर्त्यांची बैठक आजच्या संपन्न झाली. आजच्या बैठकीत अनेक मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते.

सदर बैठकीचे प्रमुख अतिथी म्हणून बल्लारपूर नगर परिषद चे माजी अध्यक्ष घनश्याम मुलचंदाणी तसेच ओबीसी सेल चे प्रदेश उपाध्यक्ष विनोद अहिरकर त्याचबरोबर या भागातील कार्यकर्ते कृषी बाजार समिती संचालक अखिल गांग्रेडीवार, माजी सरपंच विनायक बुगावार, नत्थु पाटील आरेकर, ललित मोहूर्ले, विनायक पाटील झरकर, प्रदीप कांबळे, बंडूची चीमलवार, संतोष चावरे, गणेश खोब्रागडे, कालिदास वरगटिवार, आशिष अहीरकर, देवराव भांडेकर, असे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली.
सदर बैठकीमध्ये कार्यकर्त्यांचे आभार मानण्यात आले. त्याचबरोबर तीन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत यावेळेस बल्लारपूर विधानसभेतून काँग्रेसचे उमेदवार निवडून आणायचा निर्धार करण्यात आला. आजच्या बैठकीमध्ये मोठ्या प्रमाणात खुशीची लहर दिसून आली. त्यामुळे निश्चितच विधानसभा मध्ये यावेळी बदल दिसून येईल असे चित्र पाहावयास मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here