कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधि
चंद्रपूर
झाडे लावा, आणि झाडे जगवा, हा मूलमंत्र देत गडबोरी येथील मातोश्री महिला ग्राम संघाच्या वतीने नुकतेच गावातील मोकळ्या जागेवर वृक्षारोपण करण्यात आले.
सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी येथील मातोश्री महिला ग्राम संघ महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाला जोडले असून गावात अनेक चांगले उपक्रम राबविण्याचे काम करीत आहे. यापूर्वी गावात आठवडी बाजार भरविण्यासाठी महिला ग्राम संघाने पुढाकार घेतला असून दर बुधवारला गावात आठवडी बाजार भरविण्यात येत आहे. बाजार संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी महिला ग्रामसंघाच्या वतीने बाजार भरणाऱ्या जागेची साफ सफाई करण्यात येते. शासनाच्या झाडे लावा, झाडे जगवा, या उपक्रमाला साथ देत नुकतेच गावातील खुल्या जागेवर, कडुलिंब, करंजी, जांभूळ, या प्रजातीचे झाडे लावण्यात आली. तसेच ती सर्व झाडे जगविण्याची हमी महिला ग्राम संघाच्या देण्यात आली. यावेळी मातोश्री महिला ग्राम संघाच्या अध्यक्षा प्रिया गुरू, सचिव कल्पना शेंडे, अर्चना कळसकर, आयसीआरपी अरूणा निनावे, कृषी सखी संगीता अगडे, मत्ससखी लीला कोडापे, ग्राम पंचायत सदस्या संगीता मेश्राम, यांचेसह ग्राम संघातील असंख्य महिला उपस्थित होत्या.

