
दिनाचा सोयरा
पांडुरंगाच्या भेटीला
निघाला वारकरी
वारीच्या वाटेला
डोक्यावर तुळस
हाती मृदंग टाळ
केशरी पताका
काळा लावून भाळ
अवघड वळणाचा
घाट मोठा रोटीचा
चटका बसतो
कडक उन्हाचा
घामाच्या धारांनी
अंग भिजून गेले
उंचवडीत जाताच
गार वारा अंगावर झेले
रोटी घाटात चहुबाजूने
अरुंद रस्ते दिसली
अनेक वळणात
हिरवाई फुलली
घाट परिसरात भरली
छोटी तळी पाण्याने
विठोबा रखुमाईचा गजर
करत पावली खेळण्याने
संत तुकाराम महाराजांचा
पालखी सोहळा
उंचवडीच्या माळरानावर
विसावून होईल जगावेगळा
कवियत्री संगीता नागदिवे (सना)
यवतमाळ














