येना ग परतूनी तु आई
आठवण येतीय क्षणाक्षणाला
दाटला कंठ माझा
सावर ना ग या निशब्द मनाला
कळत नव्हतं तुझं मन
पण, तुला सर्व कळायचं
कोणाला कधी, काय हवं
ते सर्वांनाच मिळायचं
परखं आहे जग सार
तु गेल्यावर कळलं
का? शिकवायचीस शहाणपण
ते आज मला वळलं
दोन अक्षरी शब्दामध्ये
सार जग समावलंय
सर्वासाठी राबता राबता
तु स्वताच अस्तित्व गमावलंय
श्वासा श्वासात स्पंदन
तुझे आई
लागता ठेचं मला
मूक वेदना ती तुला होई
तु दिलेल्या संस्काराची शिदोरी
जन्मभर मला पुरेल
चंद्र सूर्यासम जगी
नाम मात्र आईच उरेल
तु नसताना जिवना माझ्या
औक्ष तरी काय?
जन्मोजन्मी तूच असावीस
साधी भोळी माझी माय
कवीयत्री सीमा गाडेकर
यवतमाळ

