अश्विनी कोटमे
महिला जिल्हा प्रतिनिधी,
नाशिक
नाशिक : राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची राज्य कार्यकारणी बैठक आज दिनांक 7 जुलै 2024 रोजी त्रंबकेश्वर जिल्हा नाशिक येथे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीत मार्गदर्शन करताना अण्णासाहेब कटारे यांनी सांगितले की नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या आहेत महाराष्ट्रातील जनतेने कुठल्याही एका प्रस्थापित पक्षाला पूर्णपणे समर्थन दिले नाही त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेचा कौल वेगळाच दिसून येत असल्याने, सरंजामी प्रस्थापित भांडवलदार पक्षाना आता येथील जनता कंटाळली आहे. जातीय / धार्मिक ध्रुवीकरण करून मते घेण्याचा काही पक्षानी केविलवाणा प्रयत्न केला तर काही पक्षानी भारताची राज्यघटना बदलली जाईल अशी परिस्थिती निवडणुकी दरम्यान उभी केल्याने त्यांना थोडाफार लाभ झाल्याचे दिसते. वास्तविक पाहता या देशातील राज्यातील कोणताही प्रस्थापित पक्ष येथील गोरगरीब दलित वंचित अल्पसंख्यांक बौद्ध ओबीसी समुहाला राजकीय प्रतिनिधीत्व देण्यास तयार नाही.केवळ ह्या घटकांची निवडणूकीत मते लाटून त्यांना नंतर वाऱ्यावर सोडायची हीच नीती वर्षानुवर्षी सुरू आहे. म्हणूनच राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षानी राज्यातील सर्वच पुरोगामी छोटे-मोठे पक्ष संघटना यांना एका व्यासपीठावर आणून आगामी होणाऱ्या निवडणूक लढवल्या जातील असे अण्णासाहेब कटारे यांनी बैठकीत सांगितले. रिपब्लिकन आंबेडकरी चळवळीतील राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचा जनाधार मोठ्या प्रमाणात आहे. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र कोकण मुंबई या सर्वच विभागांमध्ये राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची संघटनात्मक ताकद आहे. ज्या भागांमध्ये पक्ष उत्तम प्रकारे निवडणुकीत परफॉर्मन्स उभा करू शकतो अशा ठराविक मतदार संघात राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष आपले उमेदवार उभे करणार असून, लवकरच विभागीय बैठका, मेळावे, जाहीर सभा, पत्रकार परिषद, राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांचे नेतृत्वाखाली सुरू करणार आहे बैठकीत महाराष्ट्रातून सर्व जिल्ह्यातून प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत पक्षाचे राष्ट्रीय महासचिव बाबुराव मेश्राम, राष्ट्रीय प्रवक्ते गिरीष अकोलकर, राष्ट्रीय उपाध्यक्ष शेषराव गणवीर, युवा नेतृत्व बिपिन कटारे, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष शांताराम थोरे, महाराष्ट्र प्रदेश जनसंपर्क प्रमुख सचिन भाऊ नांगरे, मराठवाडा प्रदेशाध्यक्ष संतोष मोकळे, संपर्कप्रमुख राजन भालेराव, जेष्ठ रिपब्लिकन नेते दिपक भाई ननावरे, मुंबई प्रदेश प्रभारी वसंतराव वाघमारे, छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) युवा जिल्हाध्यक्ष संदीप गायकवाड, संभाजीनगर औरंगाबाद कामगार आघाडी अध्यक्ष अनिल शिंदे, इगतपुरी तालुका शहराध्यक्ष राजु दोंदे, युवा नेते येवला तुषार वाघ, ठाणे जिल्हा शहर युवा अध्यक्ष साईनाथ खरात, पंढरीनाथ आव्हाड नाशिक, कैलास कटारे गंगापूर नाशिक, दिलीप प्रधान नाशिक, चंदूशेठ कटारे गंगापूर नाशिक, राजाराम बनसोडे मरळगोई, अशोक कटारे, धुळे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष-संग्राम बनकर संजय गवार,प्रशांत शिंदे नाशिक शहराध्यक्ष, सुनिल सोनावणे नांदगांव, महाराष्ट्र प्रदेश प्रभारी महिला आघाडी मीना भालेराव, उत्तर महाराष्ट्र जनसंपर्क प्रमुख रमाताई भालेराव, ठाणे जिल्हा अध्यक्षा महिला आघाडी रंजना कदम ठाणे जिल्हा अध्यक्ष आरोग्य विभाग रंजना भांगे, मिना भिल्ल -धुळे, संगिता गायकवाड नाशिक, निता गायकर औझर,काजल सरदार नाशिक आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

