वर्धा प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज नेटवर्क
स्थानिक वर्धा जिल्हा परिषद समोर असलेल्या बापुरावजी देशमुख यांच्या स्मारक चौकातील रस्त्यांच्या कडेला बांधकामाच्या अनुषंगाने मोठा रस्ता खोदून ठेवण्यात आला होता, सदर रस्ता हा वळणावर खोदुन असल्या कारणाने त्या स्थळावर अनेक अपघात गेल्या एक महिन्यात घडले, याच आधारवर एम आय एम चे जिल्हा प्रभारी तथा शहराध्यक्ष आसिफ खान यांनी वर्धा नगर पालिकेच्या उप मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन खोदकाम करून ठेवलेल्या स्थळी ठिय्या आंदोलन करत असल्याची माहिती दिली.
लागलीच ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले, प्रशासनात हालचाली सुरू झाल्या आणि अवघ्या 2 तासाच्या आत रत्यावरील त्या जीवघेण्या खड्ड्याला दुरुस्त करण्यासाठी नगर पालिका प्रशासनाच्या वतीने, ठेकेदार मार्फत सिमेंट काँक्रिट मिक्सचर मशीन व कर्मचारी पाठवून काम पूर्णत्वास नेण्याचा आले.
एम.आय. एम. चे आसिफ खान यांच्या या आंदोलनाला वर्धा जिल्हा आम आदमी पार्टी जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांनी समर्थन जाहीर करून आपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनात प्रत्यक्ष सहभाग नोंदवला.
तसेच आंदोलन स्थळी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सुधीर भाऊ पांगुळ यांनी भेट देऊन मागणीचे समर्थन केले.
आंदोलनात जिल्हा प्रभारी तथा शहराध्यक्ष आसिफ खान, आप जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड, आप जिल्हा महासचिव असलम पठाण, इसराईल शेख, फिरोज सैय्यद, दत्तु भोंबे, स्वप्नील पाठनकर, रोशन कांबळे, सोहेल बेग, तन्वीर बेग, शेख हुसेन, शेखर वर्मा, रुपेश चौधरी, अर्शिद शेख. यांच्या सह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

