आदर्श एकता सामाजिक संघटना, आर्वी मार्फत दिले निवेदन
आर्वी प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज नेटवर्क
स्थानिक आर्वी-अमरावती मार्गावरील नव्याने केलेले रोडवरील नाल्यांचे बांधकाम हे अतिशय निकृष्ट दर्जाचे दिसून आले आहे. कारण सदर नाल्यांवर शेफ गार्ड लावलेले नाही, तसेच पावसाळ्यातील पाणी सदर नाल्यांद्वारे न वाहता रोडवरच साचून राहत आहे. त्यामुळे ये-जा करणाऱ्या नागरीकांना तसेच शाळकरी मुलांना सदर नाल्यांचा व ब्रेकर नसल्या मुळे धोका निर्माण झालेला आहे. अशातच भविष्यात अपघात होऊन जिवहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी जबाबदार कोण ? असा सवाल गौतम अशोकराव कुंभारे अध्यक्ष, आदर्श एकता सामाजिक संघटना, आर्वी यांनी उपस्थित करून या समस्येवर लवकरात लवकर शासनाने तोडगा काढावा याकरिता उपविभागीय अधिकारी , आर्वी यांच्यामार्फत अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, नागपूर व मा. तहसीलदार साहेब,आर्वी यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे सन्मानिय मुख्यमंत्री साहेब यांना सदर निवेदन देण्यात आले आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष गौतम अशोकराव कुंभारे, उपाध्यक्ष प्रा.अमर काशिनाथ भोगे, सेजल डोंगरे, दीपक दहिया, अनिल तायडे,सौरभ सवई, विनोद कांबळे आनंद दहिया, बंटी माहुरे, प्रतीक कांबळे, अमोल गोडाने,मनोज गोंडणे, प्रशांत रामटेके,संजय ठाकूर,जितेंद्र भितकर, अविनाश गोंडणे, प्रभाकर मनवर, प्रदीप, विजय कुंभारे जैन,वर्धा सपादक तथा मार्शल अर्पित वाहने,पखाले, शोभीत कुंभारे तसेच आर्वी शहरातील आर्वी-अमरावती रोडवरील रहिवासी नागरीक व आदर्श एकता सामाजिक संघटनेचे कार्यकारणी मोठ्या संख्येने उपस्थित होते, त्यावेळी तात्काळ कारवाई न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.

