आरमोरी प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज नेटवर्क
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १५० व्या जयंती निमित्ताने रचना प्रकाशन साहित्य राज्यस्तरीय समूह आरमोरी जिल्हा गडचिरोली या समूहात आँनलाईन निबंध लेखन स्पर्धा घेण्यात आली.
या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातील एकूण ३७ कवी कवयित्रींनी सहभाग नोंदविला होता. स्पर्धेचे परीक्षण बेळगाव येथील अभंगाचे गाढे जाणकार रंगराव बन्ने यांनी केले. या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट विजेते पद धुळे येथील वैशाली जगताप बोरसे यांनी तसेच उत्कृष्ट नामांकन अकोल्याचे दिनेश मोहरील यांनी पटकावले आहे. प्रथम क्रमांकाचे मानकरी नागपूर येथील कामगार कवी लीलाधर दवंडे तर द्वितीय क्रमांकाचे मानकरी कवयित्री डॉ. मीनाक्षी निळेकर माजलगाव व कवी समाधान दिनकर लोणकर हिंगोली हे ठरले. तृतीय क्रमांक कवी संजय देशमुख पळसखेड व कवी कालिदास सुर्यवंशी गोंदिया यांनी पटकावला. उत्तेजनार्थ नामांकनात प्रथम स्थानी कवयित्री शोभा कोठावदे मुंबई, कवयित्री यामिनी मडावी गडचिरोली, सिद्धार्थ सुर्वे मुंबई हे यशस्वी ठरले.
स्पर्धेचे आयोजन रचना प्रकाशन साहित्य मंच आरमोरी च्या संस्थापक सुनिता तागवान यांनी केले. यावेळी प्रशासिका सुजाता उके, कलावती कोल्हटकर, वंदना मडावी यांचे सहकार्य लाभले.

