प्रशांत रामटेके
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज
चंद्रपूर दि.9:- चांदा जिल्हा संताजी शिक्षण प्रसारक मंडळ,तर्फे शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात सन 2023-24 मध्ये 10 उत्तीर्ण 90 टक्के,12 वी सायन्स 85 टक्के,कला कॉमर्स 70 टक्के, पदविधर प्राप्त कला,व कॉमर्स विधी व इतर 65 टक्के,सायन्स 75 टक्के, पदव्युत्तर सायन्स एम. एस.सी.65 टक्के,कला एम. ए.एम.काॅम 65 टक्के,बीएड 75 टक्के,इंजीनियरिंग पदविका 75 टक्के, डिप्लोमाधारक 75 टक्के,डी फार्म 75 टक्के,सी.ई.टी. व पी.एम.टी.150 चे वर असणाऱ्या सन 2023-24 च्या परीक्षेत चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थी व विद्यार्थिनीचा सत्कार तसेच समाजात वावरणाऱ्या शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात ज्यांनी 2023-24 मध्ये राज्यस्तरावर प्राविण्य व उत्कृष्ठ कामगिरी भूषवली असतील त्यांचा सत्कार दिनांक 11 ऑगस्ट 2024 रोजी स्थळ- श्री संताजी वस्तीगृह, रेंजर कॉलेज समोर ,मूल रोड, चंद्रपूर येथे करण्यात येणार आहे.
तरी प्रमाणपत्राच्या सत्यप्रती साक्षांकित केलेल्या व स्वतःचे दोन पासपोर्ट साईज फोटो आणि मोबाईल नंबर दिनांक 8 ऑगस्ट 2024 पर्यंत माजी नगरसेविका सौ कल्पनाताई बगुलकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात, बालाजी मंदिर मागे, बाबूपेठ वार्ड, चंद्रपूर मोन. – 9096780491 या ठिकाणी आपल्या संपूर्ण पत्त्यासह पाठवावे.सर्व वैद्यकीय पदविका पी.एच.डी.धारक विद्यार्थी हा चंद्रपूर जिल्ह्यातील असावा.तसेच 11 वीच्या( बीपीएल धारक) अंतोदय गरीब 11 विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात येणार आहे.असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष डॉ. वासुदेव गाडेगोणे यांनी केले आहे.

