आरमोरी प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज नेटवर्क
कर्मवीर विद्यालय तथा कला कनिष्ठ महाविद्यालय, वासाळा (ठाणेगाव) येथे आज दिनांक ९ जुलै २०२४ ला राष्ट्रीय हरित सेनेच्या वतीने मा. रविंद्र जनवार सचिव, गोंडवन विकास संस्था नागभीड जिल्हा चंद्रपूर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
सदर कार्यक्रमा प्रसंगी विद्यार्थ्यांना पर्यावरणातील कमी होत असलेले जंगलाचे प्रमाण, झाडाचे महत्त्व, झाडे लावा झाडे जगवा या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले,
सदर कार्यक्रमाला प्राचार्य सुनील मेश्राम ,पर्यवेक्षक प्रमोद दिघोरे, प्रा.नानाजी रामटेके, प्रा. मनोज आलबनकार, प्रा.विनोद कुनघाडकर, हरीत सेना प्रमुख, हेमंत मोहितकर, भास्कर उरकुडे तसेच सर्व शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच हरीत सेनेचे विद्यार्थी उपस्थित होते.

