दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
सागर शिंदे
वाशिम जिल्हा प्रतिनिधी
वाशिम : शहरातील विकास कामे वारंवार मुदतवाढ घेऊनही पूर्ण न करणाऱ्या मे. अजयदिप इन्फ्राकॉन प्रा. लि. औरंगाबाद या कंपनीवर दंडात्मक कारवाई करून काळ्या यादीत टाकावे, तसेच दंड माफ करणाऱ्या मुख्य अभियंता अमरावती, अधीक्षक अभियंता अकोला, कार्यकारी अभियंता वाशिम, कनिष्ठ अभियंता वाशिम यांना निलंबित करून त्यांच्या संपत्तीची अंमलबजावणी संचालनालय किंवा सक्तवसुली संचालनालय मार्फत चौकशी करण्याच्या मागणीसाठी बुधवार दि.१० जुलै पासून आम आदमी पार्टीचे राम पाटील डोरले हे मुंबई येथील आझाद मैदानावर बेमुदत उपोषणाला बसणार आहेत.
यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपमुख्य सचिवांना दिलेल्या निवेदनात नमूद केले की, सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र शासन यांचे निविदा मंजुरी पत्र क्रं. निविद-२०२१ / व्र.क्र. ३९/ रस्ते-५ दि.०२.०३.२०२१ कार्यारंभ आदेश दि. ०४/०३/२०२१ काढून मे. अजयदिप इन्फ्राकॉन प्रा. लि. औरंगाबाद ४०७ अक्षयदिप ९ टाऊन सेंटर सिडको औरंगाबाद या कंपनीला देण्यात आला आहे. करारनाम्याची मुदत हे आदेश दिल्या पासून ४०० (चारशे) दिवस राहिल. आपण हे काम दिलेल्या मुदतीतच पूर्ण करून घेणे अपेक्षीत होते. परंतु, असे न होता वारंवार मुदत वाढ देऊनही ही कामे पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे या कंपनीवर दंडात्मक कारवाई करून कंपनीला काळ्या यादीत टाकण्यात यावे. कार्यारंभ आदेश काढून तब्बल १२०० दिवस उलटून सुद्धा वाशिम नगर परिषद हद्दीमध्ये सिमेंट कॉक्रिट रस्ते, पेव्हर ब्लॉक रस्ते व डांबरीकरणाचे रस्त्यांचे बांधकाम (रु. ४७,३७,६७,४७१/-) पूर्ण झालेले नाही.
या विरोधात आम आदमी पार्टीचे राम पाटील डोरले हे बुधवार दि. १० जुलै पासून आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत उपोषणाला बसणार आहेत.

