
नागनाथ या पिण्याच्या पाण्याच्या बॉटलचे जादा दराने विक्री करण्याऱ्यावर कार्यवाही करावी
हॉकर्स अनधिकृत यांचे वर कारवाई करुन परवाना धारकांना विक्री करू द्यावे
यवतमाळ प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज नेटवर्क
दररोज हजारो नागरिकांची वर्दळ असलेले यवतमाळ जिल्ह्याच्या ठिकाणाचे बसस्थानक समस्यांचे माहेरघर बनले आहे.याकडे संबंधित अधिकारी मात्र दुर्लक्ष करीत आहे.संविधान चौकात नवीन बसस्थानक निर्मीती करण्यासाठी मागील पाच वर्षांंपासून आर्णी रोडवर असलेल्या वर्कशॉपच्या परिसरात तात्पुरत्या स्वरूपाच्या बस स्थानकाची निर्मिती करण्यात आली होती.
परंतु गेल्या पाच वर्षांपासून आर्णी रोडवर सुरू करण्यात आलेल्या बस स्थानकात असलेल्या सुविधा तसेच विक्रेत्यांकडून लूट केल्या जात असल्याचेही तक्रारी वाढलेल्या आहे.विशेष म्हणजे या ठिकाणी शौचालय व मुत्रीघर असून या ठिकाणी महिला व सर्वसामान्यांची आर्थिक लूट केल्या जात आहे.शौचालयाला गेल्यास दहा रुपये तर लघुशंकेला गेल्यास पाच रुपये असे अनाधिकृत पणे आकारल्या जात असून गेल्या पाच वर्षांपासून मोठ्या प्रमाणात लूट झाली असून याकडे महामंडळ प्रशासन नक्कीच डोळेझाक करीत आहे. यासह या ठिकाणी महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाच्या वतीने नागनाथ या पिण्याच्या पाण्याच्या बॉटलची विक्री केल्या जात असून त्यावर स्पष्ट पंधरा रुपये किंमत लिहून असून 20 रुपये आकारल्या जात असून ही मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होत आहे.तसेच या परिसरामध्ये गोळ्या, बिस्किट, तसेच चिप्स चे पुढे विकणारे हॉकर्स असून तेही अनधिकृत असल्याची विश्वसनीय माहिती असून त्या विक्रेत्यांकडे स्वतःचे लायसन्सही नसल्याचे बोलल्या जात असून हे विक्रेते सर्रास बसमध्ये आपल्या साहित्याची विक्री करत असून ग्राहकांसोबत उद्धट वागणूक करत असल्याचेही नागरिकाकडून तक्रारी येत आहे विशेष म्हणजे बस स्थानक परिसरामध्ये चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात होत आहे याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे विशेष म्हणजे महिलांना या ठिकाणी टारगेट केल्या जात असल्याचेही दिसत आहे करीत आपण या सर्व प्रकाराची दखल घेऊन तात्काळ योग्य ती कारवाई करावी.
जिल्हाधिकारी यवतमाळ, मा.विभागीय नियंत्रण अधिकारी महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळ यवतमाळ, आगार व्यवस्थापक बस स्थानक यवतमाळ निवेदन देण्यात आले.
त्यावेळी मनीषा तिरणकर,प्रांजली राजगडकर, जिजा तलवारे, भारती घोडेस्वार, वैशाली शेंद्रे, सावन मडावी,सुकांत वंजारी उपस्थित होते.














