परभणी प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज नेटवर्क
आज आपली परभणी हरितक्रांती परभणी वृक्षवल्ली ग्रुप परभणीचे वतीने वृक्षरोपण अभियान दिनांक 10/07/2024 आजचे वृक्षारोपण दोन ठिकाणी करण्यात आले.
परभणी पब्लिक स्कूल,एमआयडीसी, परभणी येथे 70झाडे लावली.
वसमत रोड, होंडा service centre चा रस्ता येथे 15.
अशी एकूण करंजी वड पिंपळ उंबर चाफा कनेरी अशोकाचे निलगिरी अनेक प्रकारचे झाडे वृक्ष एकूण 85 झाडे लावली आहेत.
खरा आनंद शाळेत मिळाला.
शाळेच्या प्रार्थनेत सहभाग घेतला. मुलांना मार्गदर्शन ही केले. अतिशय उत्साह आणि आनंद दायक वातावरण होते. वरुणराजानेही प्रसन्न होऊन अमृताचा शिडकावा केला.
नेहमी येणारे सभासद होते. सांगता पसायदानाने झाली.
बाकीच्या सभासदांना विनंती आपलाही सहभाग असु द्या. मिळणारा आनंद उपभोगूया…

