सिंदेवाही येथे विविध ठिकाणी वृक्षारोपण

0
186

राहुल कावळे मित्रपरिवार व नॅचरल एनवायरनमेंट अँड वाइल्ड लाइफ ऑर्गनायझेशनचे आयोजन.

कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधि
चंद्रपूर

वनविभागाच्या वतीने सुरू असलेल्या ‘एक पेड माँ के नाम’ व वन महोत्सव २०२४ हा उपक्रम सुरु असून या पर्यावरणपुरक उपक्रमात राहुल कावळे मित्रपरिवार व नॅचरल एनवायरनमेंट अँड वाइल्ड लाइफ ऑर्गनायझेशन ब्रम्हपुरी यांच्या वतीने दि. १० /०७/२४ ला सिंदेवाही शहरातील नगर पंचायत, ग्रामीण रुग्णालय, सर्वोदय विद्यालय व महाविद्यालय आणि महात्मा फुले विद्यालय परीसरात अश्या सिंदेवाही येथील विविध ठिकाणी सामूहिक वृक्षारोपण करून पर्यावरण हिताचा संदेश देण्यात आला.


या वृक्षारोपण वेळी, सिंदेवाहीचे ठाणेदार तुषार चव्हाण, तसेच सर्व पोलिस कर्मचारी ,उपस्थित होते, तसेच यदुनाथ बोरकर, मनोहर पर्वते, सुनील ठारकर, राहूल कावळे, राहुल गंडाईत, कुणाल पेशेट्टीवार, अरविंद देवतळे, शुभम बल्लेवार, अनिकेत नाट, वनविभागाचे क्षेत्र सहाय्यक गडपायले, वरवाडे, तोडसाम, राठोड, फुलझेले, चौधरी, पाटेकर, सर्वोदय महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डहारे, प्रा. नागालवाडे, प्रा. रणदिवे, प्रा. जल्लावार, सर्वोदय विद्यालयाचे प्राचार्य केकरे सर, भरडकर सर, नगरपंचायतचे काटकर सर, माजी प्राचार्य पर्वते, अरविंद देवतळे, महात्मा फुले विद्यालयाचेे प्राचार्य उईके, बोकडे, बोरकर आदिंसह पर्यावरण प्रेमींंची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here