सावली प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज नेटवर्क
सावली – सहा महीण्यापासुन बंद असलेल्या ब्रम्हपुरी आगाराच्या गेवरा-विहीरगांव-चिखली-निफंद्रामार्गाने धावणा-या प्रवाशी बसेस नियमीत सुरु करण्यासाठी ब्रम्हपुरी आगार प्रमुखास सावली तालुका कांग्रेस तर्फे निवेदन देण्यात आले.
गेवरा ते विहीरगाव दरम्यान दिड किमीचा रस्ता खराब असल्याच्या कारणावरून ब्रम्हपुरी आगाराच्या गेवरा विहीरगांव चिखली निफंद्रा मार्गे सुरु असलेल्या बस सेवा बंद झाल्याने परिसरातील सात गावांतील प्रवाशांचे प्रचंड गैरसोय होत होती, त्यामध्ये ब्रम्हपुरी मुडझा चंद्रपूर सकाळी ६:३० ला. ब्रम्हपुरी वरुन सुटणारी बस, ब्रम्हपुरी मुडझा व्याहाड ८:३० ब्रम्हपुरी वरुन सुटणारी बस,रत्नापुर-मुल-मुडझा-ब्रम्हपुरी करीता मुल वरुन ८ वाजता सुटणारी बस, ब्रम्हपुरी वरुन सुटणारी मुडझा-व्याहाड मार्गाची सायंकाळी ५:०० वाजताची मुल बस. सिंदेवाही-बोरमाळा बसेस या वेळा नियमीतपणे सुरु नसल्याने परिसरातुन बस सेवा सुरु करण्याबाबत मागणी होती,त्याबाबत अनेकदा पाठपुरावा करण्यात आला होता.परंतु परिवहन महामंडळाकडुन प्रतीसाद मिळत नव्हता.
त्यामुळे आज सावली तालुका कांग्रेस कमेटीचे अध्यक्ष नितीन गोहणे यांच्या नेतृत्वात ब्रम्हपुरी आगार व्यवस्थापक जयकुमार इंगोले यांना कांग्रेस पक्षाच्या एका शिष्टमंडळाद्वारे निवेदन देण्यात आले.यामध्ये विहीरगाव येथील दिलीप फुलबांधे,काशीनाथ मोटघरे, प्रमोद उंदीरवाडे,गेवराचे माजी उपसरपंच तिलक वाढणकर,यांची उपस्थिती होती. ब्रम्हपुरी आगाराच्या वतीने आगार अधिक्षक नितीन झाडे यांनी निवेदनात नमुद सर्व बस सेवा त्वरीत पुर्ववत सुरु करण्याचे आश्वासीत केले.

