नागपूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – काल दि. 11/072024 रोजी मॉडेल मिल चाळ गणेशपेठ परिसरात एका सहा वर्षाच्या लहान चिमुकलीच्या दुर्दैवाने हिट अँड रन ची नागपूर महानगरपालिकेच्या स्टार बस ने दुर्घटना घडलेली आहे. त्यात त्या लहान चिमुकलीच्या दुर्घटनात जाग्यावरच चिरडून मृत्यू झालेले आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात आक्रोशच्या वातावरण निर्माण झालेला आहे. तसेच आम आदमी पार्टी चे संघटन मंत्री श्री गिरीश तितरमारे यांच्या सहकार्याने व वसाहतीच्या सर्व नागरिकांनी तितरमारे यांना दुर्घटनाची पूर्ण माहिती दिली व यास मदत सुद्धा मागितली आहे आम आदमी पार्टी चे संघटन मंत्री श्री गिरीश तितरमारे, संघटन मंत्री श्री रोशन डोंगरे, सह संघटन मंत्री श्री जॉय बांगडकर,शहर सचिव श्री. सचिन वाघाडे,श्री सलीम शेख यांनी गणेश पेठ पोलीस स्टेशन इथे परिसरातल्या लोकांना घेऊन गेले व वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्यासोबत चर्चा करून परिवारांना आर्थिक मदत मिळवून द्यावी वा दोषी वर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी केली. आम आदमी पार्टीचा वाढता विरोध पाहता गणेश पेठ पोलिसांनी ज्या वाहन नी अपघात झाल्या त्या स्टार बस चालकाला अटक करण्यात आली.कंपनीच्या मालकाने दुःखी गरीब कुटुंबाला आर्थिक मदत करावी अशी मागणी जनतेसोबत आम आदमी पार्टीने करण्यात आलेली आहे. अन्यथा शव गणेश पेठ पोलीस स्टेशन इथे नेण्याचा निर्णय तिथल्या परिसराच्या लोकांनी घेतला.याच भीतीमुळे वाहन चालवण्याच्या कंत्राट कंपनी मालक हे तात्काळ परिसरात पोहोचून परिवाराला एक लक्ष आर्थिक मदत म्हणून देण्यात आलेला आहे.आणि मुलीचं अंतविधी पार पाडण्यात आलेली आहे. आम आदमी पार्टी तिकीट कुटुंबाच्या पाठीशी आहे. महानगरपालिकेच्या परिवहन विभागांनी आपल्या स्टार बसच्या चालकांना व निविदा दिलेल्या कंपनीला सक्तीचे आदेश द्यावे व अशा प्रकारच्या दुर्घटना उद्भवणार नाही याची महानगरपालिकेने नागपूर शहरातील जनतेला द्यावी अशी मागणी आम आदमी पार्टी तर्फे करण्यात आली.
नागपूर शहरातील वाहतूक पोलिसांनी शहराचे हिट अँड रन चे प्रकार वाढत आहे याला गस्त वाढवून नाका लावून आणि वाहतूक नियंत्रण करून अशा प्रकारच्या घटना घडणार नाही म्हणून स्पीड लिमिट चे बोर्ड व ब्रेकर लावून जनतेच्या जीविताची काळजी तात्काळ घ्यावी अन्यथा येणाऱ्या काळात आम आदमी पार्टी शहरातील जनतेसोबत रस्त्यावर उतरून त्यांच्या सुरक्षेसाठी वाहतूक पोलिसांना अश्या प्रकारच्या हिट अँड रन च्या अपघातांवर आळा घालण्यासाठी भाग पाडेल असे आम आदमी पार्टीचे सचिव सचिन वाघाडे यांनी सांगितले.

