यामामोतो सानला पहिल्या भेटेत मी चाळीसच्या जवळपास समजले होते. चेहऱ्यावर मेकअप, केसांचा कट, पायात हिल्स, शॉर्ट घालून माझ्या जवळ आली होती ती. तिच्या गोऱ्यापान सुंदर रेखीव रुपासमोर माझी पंचिसवी पार पडली वाटली होती मला. ती मला जपानी शिकवणार होती. पहिल्या दिवशी दिलखुलास गप्पा केल्या आम्ही. तिला जरा इंग्रजी येत असल्याने मला हायस झालं होतं. बोलता बोलता मला तीचं तिने वय सांगीतलं, मला तर धक्का बसला होता. ती त्या वर्षी साठची होणार होती.
तिला भारतीय संस्कृतिबद्दल जाणून घ्यायचे होते आणि मला जपानी. मग काय जमली आमची मैत्री. त्या वयात तिला माझी मैत्रीण होणे आवडले होते हेच मला नवलाचे वाटत असायचे .मैत्री मध्ये वायचे बंधन नसते हे आपल्याला माहीत आहे पण तरीही… आता पंचवीस वर्षाच्या बाईच्या गोष्टीत आणि तिच्या विचारात फरक असायला हवा होता पण मला कधीच तीचं वय आमच्या बोलण्यात आलं असं वाटलं नाही. मलाच वाटायचं हिला जाणून घायचं असेल आपल्या संस्कृतिबद्दल, आपल्या बद्दल म्हणून जवळ येते, पण तरीही आपल्या भारतीय संस्कृतिची साठ वर्षाची बाई मला काय करायचं ह्या विचारात नवीन काही जाणून शिकण्याची आवड ठेवेल असं तरी मी अजून बघितलं नव्हतं. काय तर उठ बस करत एवढ्यात वयात मिळालेला अनुभवातून नको असलेले सल्ले देणे हे आपल्याकडे मस्त जमतं. त्या वेळी मीच नवीन होते जपान मध्ये, म्हणून विदेशी असेच असावेत ह्या विचारात मीही कधी त्या विचारात पडले नाही. तिच्या वागण्या बोलण्याच नवल वाटत असायचे पण मी कधी ते मनात आणून विचारात आणलं नाही. त्या वयात काय आपण विदेशात राहत आहोत हेच मला भारी वाटत असायचे.
ती मला जपानी शिकवत असायची. हळू हळू ती खुलायला लागली की मी हे तर मला सांगणे आजही कठीण. मलाही तिच्याबद्दल खूप काही माहीत झाले होते. ती एकटीच राहत होती. नवऱ्याने सोडले होते तिला तीस वर्षा आधी. मुलगी लग्न होऊन टोकियोत राहायला होती. आता हीच कसं चालत असेल असा प्रश्न मला पडत असायचा पण आपली जपानी भाषेची बोंब, काय विचारता, आपण विचारायच एक आणि ती समजून काहीतरी वेगळं सांगायची असं होणार हे नक्कीच होतं. तरीही त वरून ताकभात असा माझा प्रवास सुरू झाला होता. सहा महिन्यात थोडीफार तुटक तुटक तर जपानी शिकले होते.
ती एवढं भरभरून आपल्या देशाबद्दल बोलायची. मी एक दिवस तिला घरी जेवायला बोलवायचे ठरवले, क्लास संपला आणि मी तिला आमंत्रण दिले, तिच्या सोबत तिची मैत्रिण सुद्धा सोबत होती. तिने मला तिच्या मैत्रिणीला सोबत आणू का असे नक्कीच विचारले असणार हे निश्चित पण मला कुठे एवढी जपानी येत होती. मी कधी हो बोलले मला माहीत नाहीच.
त्यात घरी आल्यावर अहोला सांगितलं तर ते म्हणाले की जपानी लोक असे घरी येत नाहीत, बाहेर भेटणे त्यांना योग्य वाटते. त्यांना तर माझ्या जपानी भाषेवर शंका होती की मी खरच त्यांना घरी बोलावले की काय बोलले. शेवटी त्यानाही अजून जपानी लोक कुठे उमगले होते. सोबत काम करणारे लोक कामपूरते बोलणारे आणि कसे समवयीन जास्त मग त्यांनी माझी काही खूप जास्त टांग खेचली नाही. आता तर मलाही मनात चुणचुण लागून राहिली होती की याममोतो सान येणार की नाही ह्याची.
To be continues…
कवियत्री – उर्मिला देवेन
जपान

