कपिल मेश्राम विशेष जिल्हा प्रतिनिधि, चंद्रपूर- सिंदेवाही – लोणवाही नगर पंचायत नगर पथविक्रेता यांची नुकतीच आठ सदस्यीय समितीची निवड करण्यात आली. त्यामध्ये अल्पसंख्यांक प्रवर्गातील अमन कुरेशी यांची समितीचे सदस्य म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली असल्याने त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
पथविक्रेता उपजीविका संरक्षण व पथ विक्री विनियमन अधिनियम २०१४ अंतर्गत नियम ११ (२) ख ( १) अन्वये नगर पंचायत कार्यालय सिंदेवाही यांनी पथ विक्रेता यांची आठ सदस्यीय समितीची निवडणूक जाहीर केली होती. यामध्ये महिला खुला प्रवर्ग १, अनुसूचित जाती महिला ३, अनुसूचित जमाती महिला १, इतर मागासप्रवर्ग १, अल्पसंख्यांक १, दीव्यांग १, असे आठ सदस्यांची निवडणूक १२ जुलै रोजी घेण्यात आली. यामध्ये फक्त आठ उमेदवारांनी अर्ज दाखल केले असल्याने आठ सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यामध्ये अल्पसंख्यांक प्रवर्गातील अमन आफताब कुरेशी यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडणूक अधिकारी म्हणून सिंदेवाही तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार प्रवीण गावंडे, यांनी निवडणूक प्रक्रिया पार पाडली. यावेळी नगर पंचायत चे नगराध्यक्ष स्वप्नील कावळे यांचे हस्ते सर्व विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र देऊन अभिनंदन करण्यात आले. तसेच सिंदेवाही तालुका पत्रकार संघ यांचे सह सर्वच स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आले. यावेळी एन यु.एल.एम. व्यवस्थापक चींतेश्वर मेश्राम, नगर पंचायत चे अधीक्षक चंद्रशेखर दौड, लिपिक नंदू सरवरे, दिनेश सहारे, सुधीर ठाकरे उपस्थित होते.

