आशिकाने रसूल ग्रुपच्या तरुणांनी केले नियोजन
कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधि
चंद्रपुर
सिंदेवाही जामा मस्जिद समोर बुधवारी लंगर व शरबताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यामध्ये मोठ्या संख्येने लोक उपस्थित झेले होते.
हजरत इमाम हुसैन यांच्या स्मरणार्थ मोहरमचा सण साजरा केला. हजरत इमाम हुसेन यांच्या हौतात्म्याचे स्मरण म्हणून साजऱ्या होणाऱ्या मोहरमच्या सणामुळे मुस्लीम परिसरासह दर्गावर रोषणाई करण्यात आली.
मोहरम महिन्याच्या ७ तारखेपासून ठिकठिकाणी लंगर (भंडारा), शरबत आदी वाटपाची प्रक्रिया सुरू झाली असून, मोहर्रम १० तारीख बुधवारी १७ जुलै रोजी हा सण साजरा करण्यात आला. जामा मस्जिद आशिकाने रसूल ग्रुपच्या तरुणांनी शरबत लंगरचा कार्यक्रम आयोजित केला होता. सर्व भाविकांनी शरबत व लंगरचा आस्वाद घेतला.

