युवा नेते कादर शेख यांची मुख्यमंत्री महाराष्ट्र यांना मागणी.
जास्मिन शेख चंद्रपूर प्रतिनिधी – चंद्रपूर – नुकत्याच 14/07/2024 रोजी झालेल्या कोल्हापूर जिल्यातील विशाळगड परिसरात अतिक्रणाच्या नावाखाली नियोजनबद्ध पद्धतीने विशाळगडावरील मस्जिद आणि दर्गाह शरीफवर जमावाने केलेल्या हिंसाचार, जाळपोळ तसेच स्थानीक गजापुर गावात मुस्लिम लोकांच्या घरावर आत्मघाती हल्ले,लहान मूल,महिलांवर अत्याचार या सर्व घटनेचा आम्हीं जाहीर निषेध करतो. कारण विशाळगड आणि तेथील समस्याचें काही प्रकरण हे न्यायालयात प्रलंबित असून त्यावर कोणत्याच प्रकारचे अंतिम निर्णय झालेले नसून.अशा परिस्थितीत जमावाला हिंसांचारासाठी प्रोत्साहित करणे त्या परिसरातील विशेषतः मुस्लिम लोकांवर हल्ले करने त्यांच्या मालमत्तेचे नुकसान करने ही घटना पुरोगामी असलेल्या महाराष्ट्र राज्याला काळीमा फासणारी असून ही घटना महाराष्ट्रातील सामाजिक आणि धार्मिक तणाव निर्माण करणारी आहे. त्यामुळे तात्काळ या घटनेची नोंद घेऊन या अत्याचारात सहभागी असलेल्या आणि या जमावाला हल्यासाठी प्रोत्साहित करणाऱ्या व्यक्ती अथवा संघटनेवर तत्काळ करवाई व्हावी. तसेच विशाळगड जवळ असणाऱ्या गजापूर या मुस्लिम वस्तीवर जमावाकडून करण्यात आलेल्या जीवघेणा हल्लातील दोषींवर तात्काळ कठोर शिक्षा झाली पाहिजे. तसेच या नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आलेल्या विशाळगड मधील मशिद व दर्गाशरीफ तसेच गजापूर गावातील मुस्लिम लोकांवर व त्यांच्या मालमत्तेची तोडफोड, जाळपोळ याची नुकसान भरपाई आणि आर्थिक मदत शासनाकडून तात्काळ देण्यात यावी.
तसेच विशाळगडावरील मस्जिद आणि त्या परिसराला पोलिस संरक्षण देण्यात यावे. अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना करण्यात आली यावेळेस सामाजिक कार्यकर्ता जागृत मुस्लिम विकास मंचाचे अध्यक्ष सय्यद हाजी हारून साहब, अधिवक्ता आरजू सय्यद ताज कुरेशी साजिद शेख उपस्थित होते.

