कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधि
चंद्रपुर
सिंदेवाही तालुक्यातील मिनघरी येथे मागील ३ वर्षापासून “आमचा गाव आमचा विकास समिती” आणि ग्रामपंचायत गावातील वाढदिवस,स्मृतिदिवस, या निमित्ताने गावामधे वृक्षारोपण करीत आहे.याची दखल अनेकदा घेतल्या गेली.
दि. १७ जुलै खूशाल कसारे जिवनापूर यांच्या स्मृतिदिनानिमित्त कसारे परिवारानी या उपक्रमाची दखल घेऊन मिनघरी येथील स्मशनभूमीत विवीध प्रजातीची फळझाडे लावली.आंबा,फणस, नींबु, नारळ या प्रकारची झाडे लावन्यात आली ती जगविण्याची जबाबदारी ग्रामपंचायत आणि गावातील तरुणांनी घेतली..
ग्रामपंचायत मिनघरी येथे स्मृतिशेष खुशाल कसारे यांच्या प्रतीमेस अभिवादन करून वृक्षारोपण करण्यात आले .
यावेळी त्यांच्या पत्नी आयुष्यमती लीलाबाई कसारे, मुलगा सुमेध कसारे, प्रणाली जीवने , रामदिन नान्हे, रुपाल राऊत, अनिकेत जनबंधू जिवनापूर, मिनघरी ग्रामपंचायत उपसरपंच विमीत दहिवले, सदस्य किशोर गायकवाड, उत्तरा गुरनुले,लखन नन्नावरे, गावातील तरुण अंकित कावळे,अक्षय गावतूरे, रजत गावतूरे, सुरज खोब्रागडे उपस्थित होते

