यवतमाळ प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – यवतमाळ येथील प्रख्यात साहित्यीक आकांतकार बाबाराव मडावी यांचे भाकर कथेचा न्यु आर्टस ,काॅमर्स अण्ड सायन्स काॅलेजचे पदवी भाग एक चे मराठी विषयाचे चालु अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे.भाकर ही कथा त्यांचे भाकर कथासंग्रहातील टायटल कथा आहे.शोषण व्यवस्थेतुन कष्टकरी कुटुंबाची जमिन हडपणा-या व्यवस्थे विरुध्दचा विद्रोह, कुटुंबाची होणारी वाताहत याचे हृदय हलवुन सोडणरे प्रसंग कथेत ऊभे झाले आहेत.यापुर्वी भाकर कथा संग्रह नांदेड वि द्यापिठात एम.ए.मराठीचे अभ्यासक्रमात होता.भाकर ह्या कथेचा रोटी असा हिंदी अनुवाद सुरेंद्रसिंह ताराम यांनी केला असुन राष्ट्रीय भाषेत ही कथा दिल्लीचे आदिवासी कथा चयन या देशपातथळीवरील कथा संग्रहात प्रकाशित करण्यात आली.बाबाराव मडावी यांचे साहित्य पुणे ,औरंगाबाद,नांदेड,गडचिरोली,अमरावती या विद्यापिठातील मराठीचे एम.ए.बी.ए.चे अभ्यासक्रमात समाविष्ठ झाले आहे.त्यांचे साहित्याचा अनेकांनी एम.फील,पी.एच.डी चे अभ्यासक्रमात समावेश केला आहे.

