लेख – गुरुपौर्णिमा _!!

0
151

पहिले गुरु माझे मायबाप
करिते मी त्यांसी वंदन
अपार कष्टातूनी त्यांनी
घडविले माझे जीवन _!!

दुसरे गुरु माझे शिक्षक वृंद
करिते मी त्यांसी वंदन
शिकविला धडा ऐसा
आयुष्य झाले संपन्न _!!

तिसरे गुरु माझे नातलग
करिते मी त्यांसी वंदन
बिकटवेळी सोडीला हात
त्यांमुळेच झाले मी सज्ञान _!!

चवथे गुरु माझे सहचर
करिते मी त्यांसी वंदन
खडतर प्रवासात ही संग
जसे अंधारात आशेची किरण _!!

पाचवे गुरु माझे हा निसर्ग
करिते मी त्यासी वंदन
अतुलनीय प्रेरणेचा स्रोत
करावे त्याचे आपण जतन _!!

सहावे गुरु माझे जीवन
करिते मी त्यासी वंदन
असंख्य अनुभवातून
दिले मज बहुमूल्य ज्ञान _!!

कवियत्री – मुक्ता आगडे pk
मूल,चंद्रपूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here