कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधि
चंद्रपुर
भारतीय बौध्दमहासभा चंद्रपूर जिल्हा पुर्व कडून धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचे उद्देशाने आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमपर्यत चालणार्या वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचे आयोजन करण्यात येते या वर्षी दिनांक 21/7/2024 पासून तर अश्विन पौर्णिमपर्यत 19 विषयावर प्रत्येक विहारात वरिष्ठ केंद्रीय शिक्षिका , केंद्रीय शिक्षक , बौद्धाचार्य , विषय तज्ञ, तालुका अध्यक्ष सरचिटणीस यांच्या हस्ते मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
चंद्रपूर जिल्ह्या पुर्वतील आठही तालुक्यातील संपूर्ण विहारामध्ये वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे. चंद्रपूर जिल्हा पुर्व च्या वतीने बुद्धगीरी टेकडी मुल येथे डॉ .राजपाल खोब्रागडे अध्यक्ष भारतीय बौध्दमहासभा चंद्रपूर जिल्हा पुर्व हे सकाळी १० वाजता उद्घघाटन करून संपूर्ण तालुक्यातील विहारामध्ये उद्घघाटन होणार आहेत असे डॉ.राजपाल खोब्रागडे अध्यक्ष भारतीय बौध्दमाहासभा चंद्रपूर, लोमेश खोब्रागडे सरचिटणीस ,घनश्याम भडके कोषाध्यक्ष रमेश मानकर उपाध्यक्ष संस्कार अशोक रामटेके उपाध्यक्ष व विजया रामटेके अध्यक्ष महीला विभाग यांनी कळविले आहे..

