रविंद्र मैंद ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी प्रबोधिनी न्यूज – एसटी कामगारांच्या न्याय-हक्कासाठी व त्यांच्यावर होत असलेल्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात तसेच भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावे या मागणीसाठी एस टी कामगार सेनेचे गडचिरोली विभागाचे विभागीय सचिव नरेंद्र गाडगीलवार तसेच कामगार सेनेचे ब्रम्हपुरी आगार सचिव भैरव गराडे आणि आगार अध्यक्ष भगवान येरणे हे दिनांक २० जुलै २०२४ पडून ब्रम्हपुरी आगाराच्या समोर आमरण उपोषणाला बसले आहेत.
आज त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस असून आज दि. २२ जूलै २०२४ रोजी ब्रम्हपूरी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके व माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. राजेश कांबळे यांनी उपोषण स्थळी स्वतः प्रत्यक्षात जाऊन उपोषण कर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली. व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. उपोषणकर्त्यांच्या समस्या व मागण्या सोडविण्यासाठी राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांना देखील कळविण्यात येईल असेही यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके व माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. राजेश कांबळे यांनी उपोषणकर्त्यांना सांगितले.

