prabodhini news logo
Home गडचिरोली अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीचे यथाशिघ्र सर्व्हे करून अहवाल सादर करा

अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीचे यथाशिघ्र सर्व्हे करून अहवाल सादर करा

0
117

आमदार कृष्णा गजबेंचे संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश

देसाईगंज प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – देसाईगंज – आरमोरी विधानसभा क्षेत्रासह संपुर्ण जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून संततधार पाऊस सुरु आहे. झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्वत्र पत्रपरिस्थिती निर्माण होऊन शेतपिकांचे तसेच घरांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाल्याचे पाहु जाता झालेल्या नुकसानिचे यथाशिघ्र सर्व्हे करून तसा अहवाल शासनाला सादर करण्याचे निर्देश आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
गडचिरोली जिल्ह्यातील नागरीकांची उपजिवीका शेती व्यवसायावर अवलंबून जिल्ह्यातील नागरीकांची आर्थिक स्थिती बेताचीच आहे. सद्यास्थितीत वडसा- गडचिरोली या रेल्वे मार्गाचे काम सुरु असुन रेल्वे मार्गाकरीता माती-मुरुम टाकुन मोठी पाळ तयार करण्यात आल्याने काम सुरु असलेल्या परिसराच्या शेतातील पाण्याचा निचरा होत नाही.
त्यामुळे धान पिकाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असून अद्यापही मोठ्या प्रमाणात धान पिक पाण्याखाली दबुन असल्याने सडण्याची भिती वर्तवण्यात येत आहे.तसेच होत असलेल्या संततधार पाऊसामुळे अनेक गोरगरीबांची घरे खचून पडली आहेत.अनेकांची आर्थिक स्थिती बेताचीच असल्याने आलेल्या नैसर्गिक आपत्तीतुन संबंधितांना शक्य नाही.
ही गंभीर बाब लक्षात घेता शासकीय स्तरावरुन देय नुकसान भरपाई नुकसानधारकांना मिळणेत्सव आरमोरी विधानसभा क्षेत्रासह संपुर्ण जिल्ह्यातिल अतिवृष्टीमुळे तसेच पुरामुळे झालेल्या नुकसानीचे यथाशिघ्र सर्व्हे करून तसा अहवाल शासनास सादर करण्याचे निर्देश गजबे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.दरम्यान संततधार पाऊस सुरुच असुन नदी नाले फुगले असल्याने पाण्याची पातळी वाढतच आहे. तसेच घराची पडझड देखील सुरुच आहे.त्यामुळे पाऊस थांबताच सर्व्हेक्षणाला गती देण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here