कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधि
चंद्रपुर
सिंदेवाही तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेली नवरगाव ग्रामपंचायतच्या वतीने दरवर्षी वृक्षारोपण करीत असतात.यावर्षी सुधा नवरगाव येथील स्मशानभूमीत वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. आजच्या काळात वृक्ष संस्कृती जपली गेली पाहिजे. प्रत्येक नागरिकांनी एक तरी वृक्षाचा पौधा लावावा, असे ग्रामपंचायत तर्फे सांगण्यात आले. जगाच्या दृष्टीने ग्लोबल वार्मिंगची समस्या फार गंभीर आहे. पर्यावरणाचे रक्षण झाल्याशिवाय मानव सुरक्षित व सुखी होऊ शकत नाही. जागतिक पर्यावरणाला धोका वाढला असून यावर वृक्ष लागवड हाच एकमेव उपाय आहे. नवरगाव येथील स्मशानभूमीत विविध प्रकारचे झाडे लावून वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी सरपंच राहुल बोडणे, ग्रामविकास अधिकारी दिवाकर येरमलवार, ग्रामपंचायत सदस्य पंकज उईके, दिपक चहांदे, सुरेश गिरडकर, भोला ईदुलवार, उपसरपंच स्वाती लोणकर, रागिणी लोखंडे, सरिता बोडणे, सविता सोनवाने, सविता चौके, पूजा पंचवटे, वैभवी मेश्राम, शोभा दुर्कीवार, संजय परसरामे तसेच नवरगाव ग्रामपंचायतचे सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

