आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते 4 कोटी 70 लक्ष रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन..

0
52

रामनगर येथे 3 कोटी 50 लक्ष रुपयांतून तयार होणार अभ्यासिका

सुविद्या बांबोडे जिल्हा संपादक चंद्रपूर – आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते आज रविवारी मतदार संघातील 4 कोटी 70 लक्ष रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. यात रामनगर येथे साडे तीन कोटी रुपयांत तयार होणाऱ्या अभ्यासिकेसह बाबूपेठ येथील अभ्यासिका आणि तुकुम येथील 70 लक्ष रुपयांच्या सिमेंट काँक्रीट रस्त्याचा समावेश आहे.
सदर भूमिपूजन कार्यक्रमांना यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकर , सरोज चांदेकर, अशोक मत्ते, पुरुषोत्तम राउत, माजी नगर सेविका माया मांदाडे, आनंदराव मांदाडे, किशोर दुरटकर, राहुल नेवलकर, विजय लांजेवार, दादू हजारे, अर्चना मोहुर्ले, बालाजी मोहुर्ले, बंडू वाढई, मारोती वाढई, जनार्दन वाकडीकर, मारुती पारपल्लीवार, निळकंठ रोहणकर, बंडू चौधरी, भाऊराव ढोके, तुकाराम खारकर, मनिष पेटकर आदींची उपस्थिती होती.
चंद्रपूर मतदार संघाच्या विकासाच्या दृष्टीने आमदार किशोर जोरगेवार यांचे सातत्याने प्रयत्न सुरू असून यात त्यांना मोठे यश आले आहे. मतदार संघाच्या सर्वसमावेशक विकासासाठी त्यांनी शासनाचा मोठा निधी विधानसभा क्षेत्रात खेचून आणला आहे. यातून शहरी भागासह ग्रामीण भागात सोयीसुविधा उपलब्ध केल्या जात आहेत.
दरम्यान शहरातील रामनगर येथे अभ्यासिका आणि व्यायाम शाळेसाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी शहर विकास निधी अंतर्गत 3 कोटी 50 लक्ष रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यातून येथे सर्व सोयीसुविधायुक्त अभ्यासिका तयार केल्या जाणार आहेत. तर तुकुम येथील सिमेंट काँक्रीट रस्त्यासाठी 70 लक्ष रुपयांचा निधी खनिज विकास निधी अंतर्गत मंजूर करण्यात आला आहे. बाबूपेठ येथेही अभ्यासिकेसाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी खनिज विकास निधी अंतर्गत 50 लक्ष रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या सर्व विकास कामांचे आज स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, रामनगर येथे 3 कोटी 50 लक्ष रुपयांत तयार होणारी अभ्यासिका विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम ठरणार आहे. या अभ्यासिकेमुळे विद्यार्थ्यांना उच्च दर्जाच्या शैक्षणिक सुविधा मिळतील. या अभ्यासिकेमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थी आपले शिक्षण अधिक सुलभतेने घेऊ शकतील. बाबूपेठ येथे एक नवीन अभ्यासिका तयार केली जाणार आहे, ज्यामुळे त्या परिसरातील विद्यार्थ्यांना उत्तम अभ्यासाची सुविधा मिळेल. तुकुम येथील 70 लक्ष रुपयांच्या सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम देखील पूर्ण होणार आहे, ज्यामुळे नागरिकांना प्रवासाच्या अडचणी दूर होणार आहे.
विद्यार्थ्यांसाठी नवीन अभ्यासिका तयार केल्याने त्यांना उत्तम शैक्षणिक संधी मिळतील. तसेच, रस्ते बांधकामामुळे नागरिकांच्या जीवनातील अडचणी कमी होतील. हे विकासकामे आपल्या समाजाच्या प्रगतीचे द्योतक आहेत. या विकासकामांच्या माध्यमातून समाजातील सर्व स्तरातील नागरिकांना लाभ मिळेल. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी हे महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे यावेळी आमदार जोरगेवार म्हणाले. या भूमिपूजन कार्यक्रमांना स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here