कविता – नुसत्या तुझ्या येण्याने

0
103

नुसत्या तुझ्या येण्याने
मनात आनंदाचा बहर
फक्त येवू नको मुसळधार
नाहीतर करतोस कहर…

नुसत्या तुझ्या येण्याने
धरणी झाली हिरवीगार
वृक्षवल्ली वा-यासह
डोलत असती नभापार…

नुसत्या तुझ्या येण्याने
लगबगीन पेरणी करून
लागे शेतकरी कामाला
तेव्हा पीक येईल भरून….

नुसत्या तुझ्या येण्याने
दाहकती धरणी शांत होई
जलधारांनी ओलेचिंब
ओल्या मातीचा सुगंध येई….

नुसत्या तुझ्या येण्याने
रिमझिम पावसाची मजा
भिजण्याची घेता कोणी
पूरात वाहिल्यावर सजा…

येता पावसाची सर सर
घरटे मोडून गेल्यावर
पशुपक्ष्यांची उडे तारांबळ
सततधार तू आल्यावर…

नुसत्या तुझ्या येण्याने
धरा पर्णफुलांनी सजली
मेघाच्या गरजल्याने वीज
कडाडून जोरात चमकली….

कवी – प्रा. नानाजी रामटेके
आरमोरी,जिल्हा गडचिरोली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here