असा दुहेरी व्यवहार का.? -आम आदमी पार्टी बल्लारपुर.
सुविद्या बांबोडे जिल्हा संपादक चंद्रपूर – बल्लारपुर बुधवार दिनांक :- 31 जुलाई 2024 नगरपरिषद शेत्रातील नागरिकांवर मागील वर्षी नव्याने “कर” लावण्याचे कारवाई करण्यात आले. त्यानुसार सामान्य जनतेला कर वाढवून मिळाले परंतु काही मोठ्या लोकांच्या दबावाखाली जे मोठे करधारक आहेत त्यांचे कर वाढले नाही, BILT सारख्या मोठ्या कंपनीला करामध्ये सुट देऊन नागरिकांसोबत दुजाभाव केला जात आहे तसेच दुसरीकडे नगरपरीषद मालकीचे दुकान-गाडे नियमानुसार तीन वर्षात लिलाव होणे गरजेचे असतांना काही स्थानिक प्रतिष्ठित नागरिकांच्या दबावामुळे काही मुठभर नामी लोकांना मनमाने व बेकायदेशीर, बिना करारनामे वाटप केले आहे. अश्याप्रकारे सामान्य जनतेला त्रास देण्याचे कृत्य नगरपरिषद करत आहे असा शहरातील आम आदमी पक्षाने थेट नगरपरिषदेवर आरोप केला आहे. “जनता चूप आहे म्हणून “घर टॅक्स” च्या नावाने नागरिकांवर अधिक कर लादू नका” असे आप चे शहराध्यक्ष रविभाऊ पुप्पलवार यांनी नगरपरिषदेला उद्देशून म्हटले आहे. मुख्याधिकारी-प्रशासक यांनी या सर्व बाबींकडे लक्ष द्यावे व जनतेवर लावलेले अधिक भार कमी करावा अशी मागणी निवेदनाद्वारे आप शिष्टमंडळातर्फे करण्यात आली आहे.
यावेळी शहराध्यक्ष रविकुमार पुप्पलवार, उपाध्यक्ष अफ़ज़ल अली, सचिव ज्योतीताई बाबरे, प्रवक्ता आसिफ शेख, मनीषाताई अकोले, आशाताई मडावी, मयूरी तोडे, संगीता तोडे, स्वप्नील हुमने व इत्यादी उपस्थित होते.

