1032 रक्तदात्यांनी केला वाढदिवस अविस्मरणीय

0
66

ना.सुधीर मुनगंटीवार यांचा जन्मदिन उत्साहात साजरा

महानगर भाजपाचे महा रक्तदान शिबिर

दिपाली पाटील जिल्हा उपसंपादक चंद्रपूर – राज्याचे वन,मत्स्यपालन व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या जन्मदिनाचे (मंगळवार 30जुलै)औचित्य साधून भारतीय जनता पार्टी महानगर जिल्हा चंद्रपूर च्या वतीने महानगरातील 5 मंडळात महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.यात एकूण 1032 कार्यकर्त्यांनी रक्तदान करीत ना.सुधीर मुनगंटीवार यांचे वरील प्रेमाला कृतीची जोड दिली.

भाजपा जिल्हाध्यक्ष राहुल पावडे यांच्या नेतृत्वात आयोजित करण्यात आलेल्या महा रक्तदान शिबिरात पूर्व,पश्चिम,उत्तर ,दक्षिण व मध्य मंडळात रक्तदान करण्यात आले.सततचा पाऊस सुरू असताना अत्यंत कमी कालावधीत महानगर भाजपच्या संपूर्ण टीमच्या परिश्रमामुळे एवढ्या मोठ्या संख्येने रक्तदान पार पडले याचे आता कौतुक केले जात आहे.एकूण 1032 युनिट (बोटल्स) रक्तदान झाले.यात मध्य मंडळ मधून 205 युनिट
पश्चिम मंडळ मधून 125युनिट,दक्षिण मंडळातून 109,उत्तर मंडळ 193 युनिट्स Sahi
पूर्व मंडळातून 400 युनिट रक्तदात्यांचा समावेश आहे.
महा रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी भाजपा महानगराचे सर्व पदाधिकारी,मंडळ प्रमुख व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

जनसेवेचा संकल्प हीच खरी सदिच्छा

मध्यमंळातील रक्तदान शिबिराचे उदघाटन गिरणार चौक येथ ना.सुधीर मुनगंटीवार यांचे हस्ते करण्यात आले.यावेळी बोलतांना ना.सुधीर मुनगंटीवार म्हणाले,कार्यकर्ता हा पक्षाचा आत्मा आहे.मी त्यांच्या पाठीशी सदैव आहो.रक्तदान हा माझा सर्वात आवडता कार्यक्रम आहे.ही जनसेवा आहे.ही सेवा अविरत सुरू ठेवण्याचा संकल्प करा,हीच माझ्यासाठी खरी सदिच्छा असेल असे ते म्हणाले.यावेळी ना.मुनगंटीवार यांची सुविज्ञ पत्नी सपना मुनगंटीवार यांचे सह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. शासकीय रक्तपेढी चंद्रपूर, जीवन ज्योती रक्तपेढी, अंकुर रक्तपेढी व लाईफ लाईनच्या माध्यमातून रक्त संकलन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here