प्रशांत रामटेके मुख्य संपादक प्रबोधिनी न्युज ऊर्जानगर (चंद्रपूर):-चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या ऊर्जानगर वसाहतीत कार्यरत श्रीगुरुदेव सेवा मंडळाची सन 2024 ते 2026 करिता नविन पुरुष व महिला कार्यकारीणी सर्वांनूमते गठीत करण्यात आली. नविन कार्यकारीणीने मंडळाचे विविध उपक्रम व योजना राबवून राष्ट्रसंतांचे विचार समाजातील सर्व स्तरांत पोहचवून एक सुदृढ व सक्षम समाज निर्माण करण्यास सहकार्य करेल.
श्रीगुरूदेव सेवा मंडळ ऊर्जानगरच्या कार्यालयात वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन केले होते.सन 2023-2024 या वर्षांचा जमा खर्चाचा हिशोब मंडळाचे कोषाध्यक्ष खेमदेवजी कन्नमवार यांनी उत्कृष्ट पध्दतीने मांडुन सर्वांनी मंजुरी दिली.
सभेसाठी बहुसंख्य पदाधिकारी व सदस्य यांची उपस्थिती होती.
एप्रील २०२४ ते मार्च २०२६ करीता नविन कार्यकारीणीची सर्वानुमते खालीलप्रमाणे निवड करण्यात आली.पुरुष कार्यकारिणीत अध्यक्ष रामदासजी तुमसरे, उपाध्यक्ष संतोष चहानकर, सचिव खेमदेवजी कन्नमवार, सहसचिव सुयोग व-हाटे, कोषाध्यक्ष मुरलीधरजी गोहणे, भजन प्रमुख बंडुभाऊ कुळमेथे, प्रसिद्धी प्रमुख हेमंत झाडे*.तसेच श्रीगुरुदेव सेवा महिला मंडळाची एप्रील २०२४ ते मार्च २०२६ करीता नविन कार्यकारीणी गठीत करण्यात आली. यात महिला *अध्यक्षा सविता हेडाऊ, उपाध्यक्षा वैशालीताई डूडूरे, सचिव जोत्स्नाताई बावणे, सहसचिव रागिणी काळमेघ, कोषाध्यक्षा मनीषा दुर्गे, भजन प्रमुख सविता देवतळे* यांची सर्वांनूमते निवड करण्यात आली.सर्व नवनियुक्त कार्यकारिणीचे बैठकीचे अध्यक्ष मा मारोती पिदूरकर,शंकर दरेकर सेवाधिकारी,प्रशांत दुर्गे माजी अध्यक्ष,देवराव कोंडेकर, हरीचंद्र देवतळे तसेच जेष्ठ सेविका इंदूताई वऱ्हाटे,चंदा बावणे,मुक्ता पोईनकर माजी अध्यक्षा,अर्चना गोहणे,मेश्राम काकू,रुपाली चहानकर तसेच सर्व गुरुदेव सेवक व सेविकाणी निवडीबद्दल अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

