प्रशांत रामटेके मुख्य संपादक प्रबोधिनी न्युज – त-हाडी:-तरूणांनी पुढे आले तर ग्रामविकासाला गती येते. याचा प्रत्यय शिरपूर तालुक्यातील त-हाडी येथे येत आहे. येथील तरुणांनी एकत्र येत ‘गाव विकासासाठी गावातील तरुणांनी सोशल मीडिया ग्रुप तयार केला. गावातील त्यात दहा लोक एडमिन झाले व सगळे ॲडमिन मिळून गावातील लोकांना त्या ग्रुपमध्ये ऍड करून गावातील विकास कामासाठी ग्रुपमध्ये चर्चात्मक विषय मांडण्यात आला. ग्रुपच्या माध्यमातून त्यात अनेक समस्या ग्रामपंचायत प्रशासन मार्फत करण्यातही आल्या. तरी गावात कानबाई मातेच्या उस्तव असल्याने गावात पावसाळ्याच्या पाण्यामुळे गल्लीत पूर्ण गाळा सासलेला होता. ग्रुपच्या माध्यमातून विषयी मांडण्यात आला त्या कामासाठी काही पैशाची आवश्यकता होती.
ग्रामविकासासाठी निधी संकलन करण्यासाठी तरुणांनी संकल्प केला व ग्रुपच्या माध्यमातून श्रमदानसाठी गावातील नागरिक तयार झाले व तो निधी गोळा करून जेसीबीच्या माध्यमातून पूर्ण गावातून माती गारा अनेक तरुणांनी याचा सहभाग घेतला व मदत केली गावातील लोकांनी गारा भरण्यासाठी ट्रॅक्टर ही उपस्थित करून दिले तो काढलेला गारा गावाच्या बाहेर खैवाळ होते जेथे पाण्याचा भरलेला खड्डा होता तेथे टाकण्यात आला. विशेष म्हणजे हा निधी हे युवक श्रमदानातून गोळा करत हे शक्य झालं. गावात कुणाचेही काही काम असले की हे ग्रुपमध्ये माहितीचा आधारे हे काम केले जात आहे.व त्यातून स्वच्छता अभियानही राबविले जात आहे. या स्वच्छता अभियानामुळे गावातील प्रशासन ग्रामविस्तार अधिकारी पावरा साहेब व ग्रामसेवक देविदास धाडे साहेब यांनी अभिनंदन केले.

