अण्णाभाऊ साठे हे गावकुसा बाहेरील समाजाच्या व्यथा मांडणारे फकीराकार-मिलिंद घाडगे

0
122

बीड प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – परळी येथील वडसावित्री नगर, राम- रहीम नगर येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून वंचितचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्नजीत रोडे, ता. युवाअध्यक्ष राजेश सरवदे, युवा नेते शिवा पारधे, वंचितचे ता. उपाध्यक्ष एजाज शेख, वंचितचे ता. युवा महासचिव ज्ञानेश्वर गीते, गोविंद गीते हे उपस्थित होते.
अध्यक्षीय समारोप करताना मिलिंद घाडगे यांनी सांगितले की अण्णाभाऊ साठे यांनी गावकुसाबाहेरच्या लोकांना जागृत करून त्यांच्यावर लादलेल्या गुलामीमुळे त्यांचे जीवन जगणे कठीण होते अज्ञान, अंधश्रद्धा, मानसिक, शारीरिक गुलामी यामुळे मागासवर्गीय समाजाचे हे विदारक चित्र कथा कादंबऱ्याच्या माध्यमातून अण्णाभाऊंनी जगाच्या वेशिवर टांगले. आंदोलनाच्या शेवटच्या टप्प्यात अण्णाभाऊंनी मातंग समाजाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरच तुमचा उद्धार करू शकतात तेच तुमच्यावरती लादलेली गुलामी दारिद्र्य, अंधश्रद्धा घालू शकतात बाबासाहेबांनी दाखवलेल्या मार्गाने चाला असे आव्हान गीतांच्या शाहिरीच्या माध्यमातून मातंग समाजाला केले. असे विचार घाडगे यांनी मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व मान्यवरांचा सत्कार जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षा कल्पनाताई कांबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन मनिषा लोंढे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रामदास वैरागे, आकाश बल्लाळ, विकास बल्लाळ, गणेश पोळ, विजयरत्न उपाडे, देवा जोगदंड ,अशोक उपाडे, राहुल पांचाळ, वैजनाथ पांचाळ, भारत जोगदंड, कोंडीराम जोगदंड, हनुमंत जोगदंड, अर्जुन लोंढे, सौरभ वैरागी, श्रीराम जोगदंड, अरुण जोगदंड, मीना वैरागे, अयोध्या कांबळे, सीमा जोगदंड, संगीता ताई उपाडे, उषा जोगदंड, चंद्रभागा उपाडे, भाग्यश्री पोळ, शकुंतला कांबळे, सीमा कांबळे, सुशीला पोळ, शांताबाई पांचाळ, राहीबाई वैरागी, राजूबाई इत्यादी असंख्य महिला पुरुषांनी घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here