प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – समाजासाठी निस्वार्थ रूपाने कार्य करण्यात योग नृत्य परिवार नेहमीच अग्रेसर राहिला आहे.
योग नृत्य परिवार ट्रस्ट मुख्यालय चंद्रपूरचे संस्थापक भाई श्री गोपाल जी मुंदडा, सामाजिक कार्यकर्त्या मुग्धा खांडे, सामाजिक कार्यकर्ते प्रसन्न बाटवे, किशोरी ताई हिरुडकर, सुरेश घोडके यांच्या संकल्पनेतून आणि प्रयत्नातून प्रथमच चंद्रपूर शहरातील नागरिकांसाठी शंख वादन शिकण्यासाठी दोन दिवसिय शिबिराचे आयोजन येत्या 10 आणि 11 ऑगस्ट रोजी करण्यात आलेले आहे.
10 ऑगस्ट ला संध्याकाळी 6 वाजता लक्ष्मीनारायण मंदिर.
11 ऑगस्टला सकाळी 7 वाजता आझाद गार्डन हे शिबिराचे स्थळ राहणार आहे.
या शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे शंख वादन हे एक संस्कृती जपण्याचा कलागुण आहे त्यातच शंख वादनामुळे आपल्या शरीराला अनेक फायदे होतात, शंख फुंकल्याने शरीरात एक पॉझिटिव्ह ऊर्जा तयार होते, फुफ्फुस आणि हृदयाची क्षमता सुधारते असे अनेक फायदे आपल्याला होतात.
या शिबिरा करिता नागपूरहून तरबेज शिक्षक बोलवण्यात येत आहे.
ही कला शिकण्याकरिता वयाची कुठलीही मर्यादा नाही, अगदी लहान मुलांपासून तर वयोवृद्धांपर्यंत कोणीही या शिबिराचा लाभ घेऊ शकतात. इच्छुक असणाऱ्यांनी अधिक माहिती करिता आणि शिबिरात सहभागी होण्याकरिता संपर्क साधावा.
गोपाल जी मुंदडा7219398599, मुग्धा खांडे 8605626178, प्रसन्न बाटवे 9422153174, किशोरी हिरूडकर 9422263462

