सिंदेवाही तालुका पत्रकारांशी साधला संवाद
कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधि
चंद्रपुर
दोन दिवसापूर्वी सिंदेवाही पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक म्हणून रूजू झालेले नवीन ठाणेदार विजय रामकृष्ण राठोड यांनी सिंदेवाही तालुका पत्रकार संघासोबत संवाद साधत तालुक्यातील व शहरातील वाढती गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असून सामाजिक एकोपा अबाधित राखण्याचा प्रयत्न करणार आहे. असे नवनियुक्त पोलीस निरीक्षक विजय राठोड यांनी पत्रकारांना सांगितले. यावेळी पुष्पगुच्छ देऊन तालुका पत्रकार संघाच्या वतीने अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
यवतमाळ, कळंब, अमरावती, चंद्रपूर, नागभिड, यासारख्या शहरात पोलीस विभागात सेवा दिली असून नुकतेच ते सिंदेवाही पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक म्हणून रुजू झाले आहेत. यापूर्वी त्यांनी अनेक गुन्हेगारी प्रवृत्तीच्या प्रकरणात लक्ष घालून त्याचा विमोड करण्याचा प्रयत्न केला आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या अनेकांचा त्यांनी बंदोबस्त केला आहे. दरम्यान सिंदेवाही शहरासह तालुक्यातील सामाजिक एकोपा अबाधित राहण्यासाठी प्रयत्न करणार असून सामाजिक सलोखा वाढविण्यासाठी शहरातील प्रतिष्ठित व्यक्तींचे सहकार्य घेणार असल्याचे बोलून दाखविले आहे. सण, उत्सव, मध्ये शांतता, सुव्यवस्था, अबाधित ठेवण्याचा प्रयत्न करणार असून , अवैध्य व्यवसाय, अवैध्य दारू विक्रेत्यांवर कायदेशीर कारवाही करणार आहे. शहरातील रहदारी, बसस्थानक परिसरातील युवक – युवतींचे बेजबाबदार पणे वागणे , शालेय तथा महाविद्यालयीन विद्यार्थी मादक पदार्थाचे आहारी गेले असल्यास शाळेमध्ये विद्यार्थ्यांसोबत संवाद साधून यावर अंकुश लावणार असल्याचा मानस पोलीस निरीक्षक विजय राठोड यांनी व्यक्त केले आहे. यावेळी सिंदेवाही तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत कामतवार, उपाध्यक्ष मिथुन मेश्राम, सचिव महेंद्र कोवले, कोषाध्यक्ष संदीप बांगडे, सुनील गेडाम, अमोल निनावे, अमन कुरेशी, प्रवीण नागदेवते , इत्यादी उपस्थित होते.

