प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – चंद्रपूर – अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार विवेकवादापर्यंत नेत कृतिशील करणारे जात,धर्मनिरपेक्ष असलेले एक सशक्त संघटन म्हणजे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आहे.या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या विचारांचा वारसा खूप जुना आणि मोठा आहे.बुद्ध ,चार्वाकापासून ते अलीकडच्या संत गाडगेबाबा, तुकडोजी महाराजापर्यंत विचारांचा हा वारसा समितीने महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच कृतीशीलपणे संघटित केला अशा या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या 35 व्या वर्षपूर्ती दिनानिमित्त चंद्रपूर जिल्हा व ऊर्जानगर शाखेतर्फे वृक्षारोपण कार्यक्रम स्नेहबंध सभागृह परिसरात आयोजित करण्यात आला होता या वृक्षारोपण कार्यक्रमाला चंद्रपूर जिल्हा कार्याध्यक्ष मा पी एम जाधव सर,जिल्हा प्रधान सचिव मा.नारायण चव्हाण,जिल्हा महिला कार्यवाहक कविता राजूरकर,जिल्हा युवा कार्यवाहक किसन अरदळे, ऊर्जानगर शाखेचे अध्यक्ष मा.मुर्लीधर राठोड,कार्याध्यक्ष मा.देवराव कोंडेकर, उपाध्यक्ष दुरेंद्र गेडाम व शंकर दरेकर तसेच संजय जुनारे,विजय राठोड,सुरेंद्र इंगळे, दिपक मडावी,वानखेडे व महा अंनिस ऊर्जानगरचे पदाधिकारी आणि सदस्यांची उपस्थिती होती.
यावेळी विविध फळांची वृक्ष लावण्यात आली व त्याच्या संगोपनासाठी ट्रीगार्ड लावण्यात आले तसेच त्याच्या संगोपनाची जबाबदारी घेण्यात आली.

