आप नेते मनीष सिसोदिया यांना जमीन मिळताच कार्यकर्ते उत्साहित..
भद्रावती प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – आज दिनांक 09 ऑगस्ट 2024 रोजी आम आदमी पार्टी वरोरा – भद्रावती विधानसभा क्षेत्राचे कार्यकर्त्यांनी मिळून फटाक्याची आतिषबाजी करून व नागरिकांना मिठाई वाटून जल्लोष केले. गेल्या 17 महिन्या पासून आम आदमी पार्टी चे दिल्ली चे पूर्व शिक्षा मंत्री तथा उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया जी यांना सर्वोच्च न्यायालया कडून जमीन मिळाली. दिल्ली मधे सरकारी शाळा सुधारनारे व देशाला शिक्षण क्षेत्रात एक नवीन ओळख निर्माण करून देणारे म्हणजेच मनीष सिसोदिया. ED व CBI ने मिळून खोट्या आरोपात मनीष सिसोदिया जी यांना अटक करण्यात आले होते. परंतु ते म्हणतात न की, सत्य परेशान हो सकता है, लेकिन पराजित नहीं। त्याच प्रकारे ED व CBI ला मनीष सिसोदिया यांचा विरोधात कोणतेही ठोस पुरावे मिळाले नसल्यामुळे त्यांना आज जमीन मंजूर करण्यात आले आहे. त्या मुळे देशभरातल्या कार्यकर्त्यान मधे एक नवीन उर्जा निर्माण झाली असे बघायला मिळत आहे. वरोरा – भद्रावती विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष तथा जिल्हा उपाध्यक्ष सुरज शहा कार्यकर्त्यान सोबत मिळून बाळासाहेब ठाकरे प्रवेश द्वार येथे फटाक्याची आतिषबाजी करत, नागरिकांना मिठाई वाटून जल्लोष साजरा केला. यावेळी आम आदमी पार्टी चे जिल्हा उपाध्यक्ष सुरज शहा, युवा जिल्हा उपाध्यक्ष सुमित हस्तक, शहर अध्यक्ष अनिल कुमार राम, युवा शहर अध्यक्ष रोहन गाज्जेवार, तालुका सचिव निखिल जट्टलवार, युवा जिल्हा सचिव आदित्य नंदनवार, जिल्हा सहसचिव सोनल पाटील, वरोरा तालुका अध्यक्ष गौरव मेले, वरोरा शहर अध्यक्ष बंटी खडके, वरोरा तालुका उपाध्यक्ष अमोल पिंपळशेडे, ओम पारखी, कार्तिक नागपुरे, राजकुमार चट्टे, विनीत निमसरकार, रितेश नगराळे, रोहित पवार, किशोर गायकवाड, सरताज शेख, सचिन पाटील व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

